आजरा साखर कारखान्याचे ऊस बिल व तोडणी वाहतूक बिल जमा.- चेअरमन प्रा. सुनिल शिंत्रे.
आजरा. प्रतिनिधी. १९
आजरा कारखान्यास दि. १/०१/२०२२ ते १५/०१/२०२२ या पंधरवड्यामध्ये गळीतास आलेला ४४ हजार १०७ मे. टन. ऊसाची ऊस दर टन. प्र. मे. टन. रु. २९०० शे प्रमाणे होणारी रु १२ कोटी ७९ लाखाची ऊस बिले संबंधित पुरवठा धारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहेत. तसेच सदर पंधरवड्यातील ऊस तोडणी वाहतूक दिले २ कोटी ३० लाख इतकी रक्कम संबंधित तोडणी वाहतूकदार यांचे बँक खात्यावर जमा केली आहेत. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन प्रा. सुनील शिंत्रे यांनी दिली आजरा साखर कारखाने सन २०२१-२२ चालू गळीत हंगाम सुरू करून ९१ दिवसात २६९५४० मे. टन. उसाचे गाळप होऊन दैनदिन साखर उतारा १२.९५ टक्के असून साखर उतारा १२. १० टक्के चालु हंगामात उसाची बिले कारखान्याने आज अखेर ऊस उत्पादकांना वेळेत अदा करण्याचे सातत्य ठेवले असून कारखान्याने १ नोव्हेंबर ते १५ जानेवारी २०२२ या कालावधीमध्ये गळीत असलेला २२२०२० मे. टन. उसाचे एकूण बिले रुपये ६४ कोटी ३८ लाख व तोडणी वाहतूक एकूण दिले रुपये ११ कोटी ५२ लाख आदा केली आहेत. तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्र बाहेरील सर्व सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला पिकलेला सर्व ऊस विश्वासाने आमचे कारखान्याकडे पाठवीत आहेत. त्यानुसार कारखाना व्यवस्थापनाने ठरल्यानुसार त्यांची ऊस बिले व तोडणी वाहतूक बिले मुदतीत सादर केली जात आहेत व इथून पुढेही त्याचे सातत्य कायम राहील पुढील होणाऱ्या संपूर्ण बिलाची व्यवस्था कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून कारखाना व्यवस्थापनाने केलेले आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्र बाहेरील सर्व ऊस उत्पादकांनी आपल्या पिकविला संपूर्ण ऊस थोडा विलंब झाला तरी देखील आमचे कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे असे आवाहन यावेळी चेअरमन श्री शिंत्रे यांनी केले
तसेच कारखाना उसाच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावा या हेतूने कार्यक्षेत्रातील उचंगी सरपण आला आहे प्रकल्प कार्यान्वित व्हावे यासाठी कारखान्यामार्फत प्रयत्न केले जाणार असून आंबे प्रकल्पातून उपसा जलसिंचन योजना आखून कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली म्हणून ऊस उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट देखील कारखाने ठेवले आहे. त्याप्रमाणे कार्यकर्त्यांमध्ये उन्नत ऊस जातीची लागण वाढावी व एकरी ऊस उत्पादन वाढावे यासाठी ऊस उत्पादन परिसंवाद आयोजित करून कार्यक्षेत्रातील गटांमध्ये शेतकरी मेळावा घेऊन शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढीसाठी प्रवृत्त करून त्यांच्या असणाऱ्या अडचणीबाबत माहिती घेऊन त्या अडचणी दूर करण्याचे प्रयत्न संचालक मंडळाने सुरू केले आहेत त्याप्रमाणे मार्च दोन हजार बावीस कार्यक्षेत्रातील ऊस गाळपाची जबाबदारी व्यवस्थापनाने स्वीकारले आहेत तरी ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांनी पिकवलेला संपूर्ण ऊस आमचे कारखान्यात पाठवून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन आनंदराव कुलकर्णी, संचालक अशोक चराटी, विष्णुपंत केसरकर, श्रीमंती अंजना रेडेकर, मधुकर देसाई दिगंबर देसाई, सुधीर देसाई, मारुती घोरपडे, सौ. सुनिता रेडेकर, मुकुंदराव देसाई, लक्ष्मण गुडुळकर, दशरथ अमृते, राजेंद्र सावंत, अनिल फडके, मलिककुमार बुरुड , सौ. विजयालक्ष्मी देसाई, जनार्दन टोपले, आनंदा कांबळे, तानाजी देसाई, विलास नाईक, तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. टी. ए. भोसले, जनरल मॅनेजर व्हि. एच. गुजर सेक्रेटरी व्हि.के .ज्योती, मुख्य शेती अधिकारी एस. आर. चौगुले आदी उपस्थित होते.