आजरा कारखान्याचे कामगारांना १२ टक्के वेतन लागू. – चेअरमन सुनिल शिंत्रे.

आजरा. प्रतिनिधी.

आजरा येथील आजरा सहकारी साखर कारखानाच्या सर्व कायम व हंगामी कर्मचारी यांना राज्यस्तरीय त्रिपक्षीय करारानुसारची १२ टक्के वेतनवाढ १ जानेवारी २०२२ पासून लागू करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन सुनील शिंत्रे यांनी दिली आजरा साखर कारखाना आर्थिक अडचणीमुळे गेली दोन वर्षे बंद राहिला होता कारखाना सुरू करण्याच्या धावपळीमध्ये कारखान्याच्या कामगार वर्गाने ५० टक्के वेतन घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन कारखाना सुरू करण्यासाठी पहिले पाऊल टाकले ने संचालक मंडळाने धाडस करून कार्यक्षेत्रातील व कार्य क्षेत्राबाहेरील सहकारी संस्थांच्या माध्यमातून निधी उभा करून कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सहकार्याने चालू गळीत हंगाम कारखाना सुरू केला कारखाना कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आज रोजी २७२९१० मे. टन गाळप करुन ३२७८५० क्विं साखर उत्पादित करून सरासरी साखर उतारा १२.११ टक्के इतका ठेवण्यात यश आले आहे कारखाना कर्मचाऱ्यांनी अनंत आर्थिक अडचण असताना देखील ५० टक्के वेतनावर काम करत असल्याने कर्मचाऱ्यांना थोडीफार आर्थिक सहायता मिळावी यासाठी कारखान्याच्या आर्थिक अडचणीतून मार्ग काढून संचालक मंडळाने त्रिपक्षीय करारानुसार ची १२ टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे त्या अनुषंगाने आजरा सहकारी साखर कारखान्यातील सर्व कायम व हंगामी कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून पगारामध्ये १२ टक्के वेतनवाढ देण्यात आल्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन सुनील शिंत्रे यांनी आज रोजी केली त्याचप्रमाणे कारखाना सुरू करण्यापूर्वी संचालक मंडळाच्या वतीने दिलेले शब्द पूर्तता करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले नववर्षाच्या सुरुवातीला ही भेट मिळाल्याने कामगारा मधून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे कारखान्याकडे ऊस पुरवठा करणारे शेतकऱ्यांची बिले तसेच तोडणी वाहतूक कंत्राटदारांची बिले कर्मचारी पगार तसेच या वर्षात कारखान्याकडे झालेल्या आर्थिक व्यवहाराची बिले दिली जात असल्याने ऊस उत्पादक शेतकरी तोडणी तोडणी मजुरी मार पुरवठादार कंत्राटदार व कामगारांच्या मध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.