Homeकोंकण - ठाणेसमतावादी बीजे शोधण्यासाठी बहुजनांची खरीखुरी संस्कृती अभ्यासली पाहिजे- डॉ. राजेंद्र कुंभार. (...

समतावादी बीजे शोधण्यासाठी बहुजनांची खरीखुरी संस्कृती अभ्यासली पाहिजे- डॉ. राजेंद्र कुंभार. ( आया. – पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न.)

समतावादी बीजे शोधण्यासाठी बहुजनांची खरीखुरी संस्कृती अभ्यासली पाहिजे- डॉ. राजेंद्र कुंभार.

आजरा. प्रतिनिधी.

आजरा येथे विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने डोंगरमाथ्यावरील बहुजनांच्या आया या  पुस्तकाचे प्रकाशन व सत्यशोधक विद्रोही शाहिरी जलसा या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि भारतीय संस्कृतीची सत्यकथा या विषयावर व्याख्यान असा संयुक्तिक कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सत्यशोधक विद्रोही शाहिरी जलसा या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. तर शाहिरी जलसाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.याचे सादरीकरण शाहीर संदीप दाभीलकर व त्याच्या टीमने  अतिशय जोरदारपणे सादरीकरण केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व व्याख्याते डॉ.राजेंद्र कुंभार यांनी आपल्या व्याख्यानात, बहुजनांच्या संस्कृतीची बीजे कुठे कुठे आहेत. बहुजनांच्या संस्कृती चा खरा इतिहास शोधण्याचं काम आता होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने मिलिंद यादव यांनी लिहिलेले पुस्तक महत्त्वाचे आहे असे मत व्यक्त केले.
मिलिंद यादव यांनी पुस्तक लिहिण्यात पाठीमागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले, सुरुवातीला फोटो काढण्याच्या आकर्षणानेच मी या आई व बाबांच्या परिसरात मनसोक्त फिरलो. निसर्ग पाहताना नकळत तेथे भेटणाऱ्या स्थानिकांशी गप्पा मारताना या आई-बाबांच्या संबंधानं अनेक जुन्या, पण माझ्यासाठी माहिती म्हणून नवीन अशा गोष्टी समोर येत गेल्या त्या मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.
चर्चासत्रामध्ये सुभाष विभूते, यांनी आपली भूमिका मांडताना या पुस्तकाची मांडणी अतिशय सुरेख झालेली आहे. हा लेखक नसून हा छायाचित्रकार आहे कलावंत आहे त्यानं लिहिलेले पुस्तक अतिशय उत्कृष्ट आहे यातील मांडणी तुमच्या आमच्या जगण्याची संबंधित आहे असे मत व्यक्त केले.
प्रा.राजाभाऊ शिरगुप्पे यांनी पुस्तकाबद्दल बोलताना त्याचे म्हणाले की, बहुजनांच्या संस्कृतीचा ठेवा जपणे जतन करणं आणि तो सत्य स्वरूपात जनतेसमोर आणणे  हे महत्त्वाचं काम मिलिंद यादव यांनी केलेला आहे. संग्राम सावंत  आपले विचार मांडताना म्हणाले, क्रांतीबा ज्योतिराव फुले यांच्या मांडणीला पुढे घेऊन जाणारे हे पुस्तक आहे. तसेच सत्यशोधक विद्रोही शाहिरी जलसाच्या  माध्यमातून आता आपल्याला बहुजनांचा इतिहास जनतेसमोर मांडायचा आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी उभे राहिले पाहिजे. अँड. सुदीप कांबळे म्हणाले की,संघटितरीत्या चळवळ करणे काळाची गरज आहे. संघटित होऊन साहित्याची ही मांडणी करणारी क्रांतिकारी चळवळ उभी राहायला पाहिजे. भारतीय संविधानाला घेऊन सत्यशोधक सेक्युलर मांडणी करणे काळाची गरज आहे. या कार्यक्रमाची भूमिका संजय घाटगे यांनी मांडली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप दाभोलकर यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार विजय कांबळे यांनी व्यक्त केले. सत्यशोधक सेक्युलर फ्रंट, मुक्ती संघर्ष समिती, भारतीय मुस्लीम विकास परिषद, महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कास्ट्राईब शिक्षक संघटना, धरणग्रस्त चळवळ, महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियन, गावठाणवाढ संघर्ष समिती या संघटनांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला होता.

या कार्यक्रमाला आजरा चंदगड गडिंग्लज भुदरगड या तालुक्यातील नागरिक तसेचअतुल खरात अलिबाग, गडहिंग्लज अंनिसचे तानाजी कुरळे व पांडुरंग करमरकर गुरुजी ,भुदरगड वंचितचे अध्यक्ष कासमभाई शेख, डाकरे साहेब, लाल निशाण पक्षाचे शांताराम पाटील, अंनिसचे काशिनाथ मोरे व भिकाजी कांबळे, धरणग्रस्त चळवळीचे शिवाजी गुरव घरकामगार युनियनचे लक्ष्मी कांबळे, रेश्मा कांबळे,मुक्ती संघर्ष समितीचे बाळू कांबळे राजेंद्र देशमुख, मजीद मुल्ला, सविता कांबळे,वंचितचे युवा नेते सुहेब आजरेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.