Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रड्रोन गावठाण सर्व्हे - उर्वरित गावचा व्हावा. - मडिलगे ग्रामपंचायतीची भुमिअभिलेखकडे मागणी.

ड्रोन गावठाण सर्व्हे – उर्वरित गावचा व्हावा. – मडिलगे ग्रामपंचायतीची भुमिअभिलेखकडे मागणी.

ड्रोन गावठाण सर्व्हे – उर्वरित गावचा व्हावा. – मडिलगे ग्रामपंचायतीची भुमिअभिलेखकडे मागणी.

आजरा. प्रतिनिधी.

मडिलगे ता. आजरा या गावातील उर्वरित गावचा ड्रोन सर्व्हे व्हावा या मागणीचे पत्र ग्रामपंचायत मडिलगे यांनी भुमिअभिलेख कार्यालय आजरा यांना दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. की
आजरा तालुक्यातील मडिलगे गाव येथील गावठाण सर्व्हे १९८८ झाला आहे. यानंतर लोकसंख्या वाढीचे व विभक्त रहाण्याचे प्रमाण यामध्ये सध्याच्या परिस्थितीनुसार उर्वरित गाव ७० % सर्व्हेक्षण तसे होणे बाकी आहे. ग्रामस्थांनी यापूर्वी झालेल्या सर्व्हे मधून गावठाण मध्ये स्वखर्चाने नवीन वास्तु बांधकाम करून विना कर्ज वास्तूचे काम केले आहे. अशी परिस्थिती सध्या या गावठाण मध्ये असून उर्वरित गावचा ड्रोन सर्व्हे झाल्यास संपूर्ण गावाला याचा चांगल्या पद्धतीने लाभ मिळणार आहे. यासाठी शासनाने हाती घेतलेल्या स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोन सर्व्हे मध्ये पहिल्या टप्प्यातील मोजणीसाठी मडिलगे धरलेले नसून जुन्या गावातील गावठाणाचा सि.टी सर्व्हे नोंद झाल्यामुळे पहिल्या टप्प्यातील ड्रोन मोजणी मध्ये मडिलगे गावाचा समावेश दिसत नाही. सध्या जुने गाव ३० % आहे. वाढीव वस्ती मधील उर्वरित गाव ७० टक्के आहे. यासाठी जागृत उर्वरित गावठाण मधील ग्रामस्थांनी आपल्या घराची गावठाण मध्ये ड्रोन द्वारे मोजणी व्हावी या मागणीसाठी ग्रामपंचायत मडिलगे सरपंच गणपतराव आरळगुंडकर, ग्रामसेविका कविता जाधव यांनी पत्रव्यवहार केला आहे.

[ मडिलगे येथील उर्वरित गावची ड्रोन मोजणी होण्यासाठी ज्या घराची ड्रोन मोजणी होणे गरजेचे आहे. आशा घरटान धारकांकडुन या मागणीसाठी पाठपुरावा, पाठलाग अपेक्षित होता तो दिसत नाही. असे न होतो सर्व घरटान धारकांनी या ड्रोन मोजणी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ]

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.