Homeकोंकण - ठाणेआमरीन अक्रम मुल्लाचे संस्मरणीय यशआजरा मुस्लिम समाजातील पहिली महिला वकील.

आमरीन अक्रम मुल्लाचे संस्मरणीय यश
आजरा मुस्लिम समाजातील पहिली महिला वकील.

आमरीन अक्रम मुल्लाचे संस्मरणीय यश
आजरा मुस्लिम समाजातील पहिली महिला वकील.

आजरा. प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील विशेषतः मुस्लिम समाजामध्ये उच्च शिक्षण घेत पहिली महिला वकील होण्याचा पहिला मान येथील आमरीन आक्रम मुल्ला हिने संपादन केला. आमरीन मुल्ला हिचे महाविद्यालयीन शिक्षण येथील आजरा महाविद्यालयात झाले. इंग्रजी साहित्यातील पदवी प्रथम श्रेणीत संपादन करून त्या पुढील शिक्षणासाठी आणि स्वाभाविक आवड म्हणून कायद्याची पदवी मिळविण्यासाठी त्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अंतर्गत सिंहगड लॉ कॉलेजमध्ये दाखल झाल्या. कायदा अभ्यासक्रमातील एलएलबी ही पदवी त्यांनी क्रिमिनल लॉयरमधून विशेष प्राविण्यासह (डीस्टिंक्शन) मिळविली आहे. त्यांचे वडील मुल्ला कुटुंबातून तर आई सायरा या येथील नाईकवाडे कुटुंबातील आहेत. पण या दोन्ही कुटुंबातून इतके उच्च शिक्षण आजतागायत कोणीही घेतलेले नाही. या पदवी संपादनातून त्यांना त्यांच्या समाजामध्ये उच्च शिक्षणाचे महत्व अधोरेखित करावयाचे होते. त्यामध्ये त्या यशस्वी ठरल्या असल्याचे समाधान त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केले.
आजवरच्या यशात कुटुंबासह विशेषतः आई – वडिलांचे प्रोत्साहन अत्यंत महत्वाचे ठरले. तर आजरा महाविद्यालयातील इंग्रजी विभागाकडील प्रा. रमेश चव्हाण यांनी विशेषतः इंग्रजी भाषेतील वक्ता म्हणून माझ्यामध्ये असणाऱ्या क्षमतेस न्याय देत त्यातील पैलू ओळखून मोठे ध्येय बाळगण्याची प्रेरणा दिल्याने आपण येथवर पोहोचल्याचे सांगितले. याशिवाय आर्षद मुल्ला, अ़ॅड.उमरशरीफ मुजावर, अ़ॅड.एस. एम. नाईकवाडे, तसेच सिंहगड कॉलेजचे प्राध्यापकगण शिल्पा गायकवाड, सोनाली वाघचौरे, कीर्ती कांबळे, नितीन भंडारे, मंजुषा मुगदलकर आदींसह अनेकांनी मार्गदर्शन केले. यापुढे क्रिमिनल लॉयर म्हणून हायकोर्ट अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत राहणार असून कायद्यातील पदव्युत्तर शिक्षणही घेणार आहे, असा मनोदय त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला. तीच्या या यशाबद्दल कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.