आजरा नगरपंचायतीची सोशल मिडियावर नाहक बदनामी करण्याचे थांबवावे. – विकास कामे होत असलेले पहावत नसल्यामुळे कट-कारस्थान. –
नगरसेवकांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती.
आजरा. प्रतिनिधी. ३०
आजरा नगरपंचायतीची सोशल मिडियावर काहीजण नाहक बदनामी करत आहेत. ती थांबवावी अपुरी माहितीच्या आधारे नागरिकांच्या मध्ये गैरसमज पसरवून काय साध्य होणार आहे. प्रत्यक्ष नगरपंचायत कार्यालयात येऊन माहिती घ्यावी. माहिती न घेता बदनामी करणारे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करु अशी नगरसेवक अशोक चराटी, किरण कांबळे, उप नगराध्यक्ष अनिरुद्ध केसरकर यांनी दि. ३० रोजी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
आजरा नगरपंचायती मध्ये विकास कामे चालु आहेत. काही जण जाणिवपूर्वक नगरपंचायतची बदनामी करण्याचा कट रचत आहेत. तर काही जण भ्रष्टाचार करणारे आमच्यावर आरोप करत आहेत. शासन चांगल्या पद्धतीने निधी येत आहे आम. प्रकाश अबिटकर यांच्या माध्यमातून नाम. एकनाथ शिंदे यांनी नगरपंचायत साठी पाणी स्कीम, नाट्यगृह, गंगामाई वाचन मंदिर, यासाठी अशा वेगवेगळ्या लागणाऱ्या विकास कामासाठी १४ कोटी रुपये अंतिम निधीला मंजुरी मिळाली आहे, अशा पद्धतीने आजरा शहरामध्ये विकास कामे चालू असताना काही महाभाग नाहक बदनामी करत आहेत. राजकारणी जरूर करूया निवडणूका येथील जातील परंतु जाणीवपूर्वक विकास कामाला आडवे येणे व बदनामी करणे हे कितपत योग्य आहे. हे फक्त नगरसेवक, नगरपंचायत यांची बदनामी करून येणारी निवडणूक लढवण्याचा उद्देश आहे. लोकशाहीने सर्वांना अधिकार दिला आहे. निवडनूकांना सामोरे जावे परंतु काम करणाऱ्यांची बदनामी करू नका अशा धोरणामुळे विकासाला गती येत नाही.
[ भाई – भाई टॉकीज ते कुंभार गल्ली रस्त्याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्यात आलेला आहे. त्या रस्त्याच्या पाईपलाईनचे काम चालू होते दरम्यानच्या काळात पावसाचे प्रमाण अधिक होते. म्हणून रस्ता करण्यास विलंब झाला व पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचे काम केल्याने काही लोक गैरसमज पसरवत आहेत. हा झालेला सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर संबंधित व्हिडिओ करून बदनामी करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे शेवटी नगरसेवक यांनी बोलताना सांगितले.]
{ मागील काही दिवसात राजकारण वेगळ्या पद्धतीचे चालू आहे. मग ते नगरपंचायत मधील गाळ्याचे असो शहराच्या दृष्टिकोनातून चांगल्या गोष्टी करत असताना वाईट गोष्टींचा खूप अनुभव येत आहे कोरणा सारख्या रोगामुळे सर्व विकास कामे थांबली होती. परंतु यापुढे प्रलंबित राहिलेली सर्व कामे येणाऱ्या काळात पूर्ण होतील. काही लोकांना चांगली काम होत असलेले पहावत नसल्याने असे राजकारण करत आहेत त्यानी थांबवावे. आजरा शहरातील हिंदू व मुस्लिम समाज कोणत्याही कामात अडथळा न आणता सहकार्याची भूमिका घेत आहेत. यामुळे आम्ही नगरसेवक विकासाकडे वाटचाल करत आहोत. या पत्रकार परिषदेमध्ये उपनगराध्यक्ष अनिरुद्ध केसरकर नगरसेवक अशोक चराटी किरण कांबळे उपस्थित होते.}
