Homeकोंकण - ठाणेबांधकाम कामगारांना बांधकाम किटचे वाटप. - आजरा. - अण्णाभाऊ सभागृहात कार्यक्रम संपन्न.

बांधकाम कामगारांना बांधकाम किटचे वाटप. – आजरा. – अण्णाभाऊ सभागृहात कार्यक्रम संपन्न.

बांधकाम कामगारांना बांधकाम किटचे वाटप. – आजरा. – अण्णाभाऊ सभागृहात कार्यक्रम संपन्न.

आजरा. प्रतिनिधी.

आजरा येथील बांधकाम कामगार असोसिएशन वतीने दि.२९ रोजी अण्णाभाऊ सभागृह येथे बांधकाम कामगारांना किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी होते. स्वागत व प्रास्ताविक नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी केले. या असोसिएशनचे अध्यक्ष इमरान सोनेखान, अब्बास नेसरीकर, मैफुज दरवाजकर, तसेच अमित खेडेकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अण्णा – भाऊ संस्थांसमुहाचे प्रमुख अशोक चराटी होते. यावेळी प्रास्ताविक करताना नगरसेवक श्री शिंपी यांनी बांधकाम कामगारांना अधिक रक्कम घेऊन काही एजंट फसवणूक करत होते. आम्ही योग्य त्या पद्धतीने नियोजन करून यापूर्वी १२०० शे कामगार लाभार्थी व आज रोजी ५०० लाभार्थ्यांना लाभ देण्याचे काम केले आहे. यापुढेही देखील कोणी लाभार्थी असतील त्यांची जबाबदारीने त्यांना सदर योजनेचा लाभ देण्याचे काम करण्यात येईल असे श्री शिंपी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपनगराध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, नगरसेवक किरण कांबळे, शिंकदर दरवाजकर, नगरसेविका सुमय्या खेडेकर, रेश्मा सोनेखान, यासाराबीन मुजावर , तसेच समीर चाॅद, कारखाना संचालक दशरथ अमृते, सह लाभार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.