आजरा. प्रतिनिधी.
प्रशासनातील अधिकारी वहीवाटीतील रस्ता सोडणे बाबत आदेश असताना टाळाटाळ करत असल्याने २६ जानेवारी २०२२ रोजी प्रजासत्ताक दिना दिवशी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला असल्याचे मडिलगे येथील रावसाहेब येसणे यांनी आजरा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मौजे मडिलगे तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथील जमीन गट नं. ११३ हि जमीन माझ्या प्रत्यक्ष कब्जे वहिवाटीत असून उक्त क्षेत्रामध्ये मला व वाढीसाठी रस्ता नसलेबाबत मी आजरा तहसीलदार त्यांच्याकडे अर्ज केला होता. त्यावर आवश्यक त्या चौकशीअंती रस्ता सोडण्याबाबत आदेश दिलेला आहे. परंतु सदर आदेशानंतर देखील प्रत्यक्ष जागेवर त्याचा अलम अंमल झालेला नाही. आदेश मिळाले नंतर मी वारंवार आवश्यक त्या ठिकाणी संयमित पाठपुरावा करून देखील आज अखेर मला न्याय मिळालेला नाही .यंत्रणांमधील प्रत्यक्ष व्यक्ती आजपर्यंत मला सहकार्य करण्याऐवजी करीत आहेत या सर्व प्रकाराला कंटाळून मी व माझी पत्नी आम्ही उभयतांनी येत्या २६ जानेवारी २०२२ पासून तहसीलदार आजरा येथे कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिलेले निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर रावसाहेब येसणे यांची सही आहे. सदर निवेदन प्रति जिल्हाधिकारी कोल्हापूर, उपविभागीय अधिकारी उपविभाग गारगोटी, डि. एस. पी कार्यालय कोल्हापूर यांना देण्यात आलेले आहेत.