Homeकोंकण - ठाणेआजरा मौजे इटे - रास्त भाव दुकान व रॉकेल परवाना रद्द करा....

आजरा मौजे इटे – रास्त भाव दुकान व रॉकेल परवाना रद्द करा. – रेशनकार्ड धारकांची मागणी. – तहसीलदार यांना निवेदन.

( नवीन जाहीरनामा निघेपर्यंत गेल्या दोन वर्षात वाटप होत असलेल्या श्री. भावेश्वरी बचत गट देऊळवाडी दुकान नं १०० या दुकानात दुकानातून धान्य वाटप करण्यात यावे. प्रमुख मागणी. )

आजरा. प्रतिनिधी.

आजरा मौजे इटे रास्त भाव दुकान क्रं ३१/२००१ व रॉकेल परवाना क्र. २२२/०५ हे परवाने रद्द करा अशा मागणीचे रेशनकार्ड धारकांनी नायब तहसीलदार संजय कांबळे यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. की मौजे इटे येथील रास्त भाव धान्य दुकान व रॉकेल वाटप परवाना सौ मंगल कांबळे यांच्या नावे असून ते दुकान प्रत्यक्ष त्यांच्या पती श्री शिवाजी कांबळे हे चालवतात परंतु गेल्या दहा वर्षात त्यांनी दुकानातील धान्य हे परस्पर विक्री करणे रेशन कार्ड धारकांची उघड बोलणे स्वतःला वाटेल त्यावेळी दुकान उघडणे अशा प्रकारचे यांचे वर्तन असल्यामुळे सर्व रेशनकार्ड धारकांनी ग्रामस्थांनी सण २०१५/१६ चे दरम्यान तहसीलदार आजरा व तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार घेऊन वरील वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणली असता तत्कालीन तहसीलदार व तालुका पुरवठा अधिकारी उपायुक्त पुणे यांनी त्यांचा धान्य परवाना बंद केला होता. परंतु त्यांनी कार्डधारकांच्या खोट्या सह्या करून मंत्री महोदया कडून पुन्हा दुकान आपण स्वतः चालवतो कोरोणाच्या काळात सन २०१९ ला शासनाकडून आलेले मोफत धान्य कार्डधारकांना न देता परस्पर विक्री केली सतत धान्य बाबत आम्ही कार्डधारकांनी पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता त्याच्या चौकशीत ही बाब लक्षात आली व त्यांनी त्याचा परवाना रद्द केला होता. परंतु सदर धान्य परवाना कार्डधारकांच्या खोट्या सह्या करून उपायुक्त पुणे यांच्याकडे अपील करून जे निकाली पत्र फेरचौकशीसाठी आपल्याकडे आले असता कार्डधारकांच्या खोट्या सह्या अधारे आपन दि. २२/१२/२०२१ रोजी काही अटीशर्ती करून त्यांना पुन्हा दुकान चालण्यासाठी दिले परंतु आपल्या दिलेल्या आदेशानुसार ते दुकान आय. एस. ओ. मधील आपल्या कोणत्याही अटी व शर्ती बसत नाही. याची आपल्या शासकीय अधिकाऱ्यांची पाहणी केली आहे दि. १८/१/२०२१ रोजी त्यांनी रास्त भाव दुकानात धान्य भरले व त्यातील ५० किलो पोलीस भरती परस्पर दुकानांमध्ये उचलून त्यांनी विक्री कार्डधारकांना न करता ज्यादा पैसे घेऊन तालुक्याच्या ठिकाणी विक्री करणार होते परंतु ग्रामस्थांनी व कार्डधारकांच्या दक्षतेमुळे सदरची बाब आम्ही कार्डधारकांनी तहसीलदार पुरवठा अधिकारी यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर सदर धान्य दुकानाची पडताळणी केली व धान्य आमच्या गावचे पोलीस पाटील युवराज कांबळे यांच्याकडे ताब्यात दिले आहे. तरी वरील सर्व बाबींचा विचार करता सदर सौ मंगल कांबळे यांच्या नावाचा धान्य परवाना व रॉकेल विक्री परवाना रद्द व्हावा.
व नवीन जाहीरनामा निघेपर्यंत गेल्या दोन वर्षात वाटप होत असलेल्या श्री भावेश्वरी बचत गट देऊळवाडी दुकान नं. १०० या दुकानातून धान्य वाटप करण्यात यावे. असे दिलेल्या यांनी निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर रेशन कार्ड धारक अनुसया पाटील, हौसाबाई गुडळकर, हौसाबाई प्रभू, सुलोचना पाटील, गंगुबाई सावंत द्रोपदी पाटील, सरस्वती प्रभु, अनुसया तेजम, सुनीता फगरे, द्रोपदी प्रभू, सोनाबाई चव्हाण, बबन पाटील, लक्ष्मी पाटील, इंदुबाई पाटील, साखरबाई पाटील, अनुसया पाटील, सरिता पाटील, कमल चव्हाण, कल्पना पाटील पांडुरंग प्रभू, गोपाळ सावंत तेजस्विनी पाटील अनिता पाटील, यल्लुबाई पाटील, सुजाता पाटील, आनंदी पाटील, लक्ष्मण साबळे, जानू फगरे, लक्ष्मण साबळे, यशोदा पाटील सुशिला कांबळे सुप्रिया कांबळे सर्व रेशन कार्ड धारकांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.