शिरपूर :- प्रतिनिधी.
शिरपूर येथील पत्रकार ईश्वर बोरसे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या पंचायत समिती कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करा.अशी मागणी शिरपूर शहर व तालुक्यातील पत्रकारांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, दैनिक समाजशक्ती एस टी व्ही न्यूज पोर्टलचे संपादक ईश्वर रतीलाल बोरसे हे वृत्त संकलन करण्यासाठी पंचायत समिती कडे गेले असता त्यांच्यावर दि. 17 जानेवारी रोजी सायंकाळी 5 ते 5.30 वाजेच्या सुमारास पंचायत समिती कर्मचारी दिग्विजय ठाकरे व त्यांच्या साथीदारांनी पंचायत समिती आवराबाहेर जीवघेणा हल्ला केला.या हल्ल्यात बोरसे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.तसेच त्यांचा मोबाईल देखील फोडला आहे. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरचे कृत्य म्हणजे माध्यमाची मुस्कटदाबी होण्याचा धोका आहे. सदर घटनेचा पत्रकारांनी निषेध व्यक्त केला.
या प्रकरणातील संशयित दिग्विजय ठाकरे यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे अशी मागणी सुभाष कुलकर्णी, प्रशांत पाटील,सचिन पाटील, भिका चव्हाण, राजेश मारवाडी, गोपाल के.मारवाडी, ज्ञानेश्वर धनगर, राजकुमार भवरलाल, संजय पाटील, महेंद्र राजपूत, मनोज भावसार,संतोष भोई, सुनिल सोनार, अनिल भोई, अमोल राजपूत, शे मोहसीन शेख, गणेश जैन, लक्ष्मण गोपाल, रवि भावसार, मोहन कोळी,विनोद सोनार, राहूल पाटील, कैलास राजपूत, विनोद सोनार, विनायक कोळी, युवराज माळी, ऋषिकेश शिंपी यांच्यासह शिरपूर शहर व तालुक्यातील पत्रकारांनी केली आहे
