Homeकोंकण - ठाणेमणिषा देसाई यांची कासार - कांडगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत विजयाकडे वाटचाल.

मणिषा देसाई यांची कासार – कांडगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत विजयाकडे वाटचाल.

आजरा. प्रतिनिधी.

आजरा कासरकांडगाव येथील पोटनिवडणुकीत रंगत येणार आहे. विद्यमान सरपंच यांनी दोन प्रभाग मधून निवडणूक लढविली होती. दोन्ही प्रभागात विजय झाले होते. यामधील प्रभाग २ चा राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक लागली असून या निवडणुकीमध्ये रवळनाथ ग्राम विकास आघाडी वतीने संजयराव सरदेसाई, सर्जेराव सरदेसाई, जयवंतराव सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसे तालुका उपाध्यक्षा मणिषा देसाई पोट निवडणूक लढवत आहेत. सौ देसाई यांचे कार्य पाहता महिला संघटन व तालुक्यातील वेगवेगळ्या आंदोलनातून आक्रमक भूमिका घेऊन महिला व शेतकऱ्यांसाठी त्या काम करत असतात, तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी अनेक तालुक्यातील महिला बचत गट सक्षम केले आहेत. त्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे बोलले जात आहे. यांचा प्रचार शुभारंभ मकर संक्रांत निमित्त मतदारांना तिळगुळ वाटून करण्यात आला प्रचार शुभारंभ करण्यात आला यावेळी आघाडीचे सर्व प्रमुख, मनसे जिल्हा उपाध्यक्ष सुधिर सुपल, महिला जिल्हा उपाध्यक्षा पुनम भादवणकर, तालुका सचिव चंद्रकांत सांबरेकर, विभाग अध्यक्ष अभिजीत पाटील, सातेवाडी शाखा अध्यक्ष परशुराम पोतनिस, विद्यार्थिसेना तालुका अध्यक्ष अश्विण एकनाथ राणे,ओमकार चौगुले, कासरकांडगाव महिला शाखा अध्यक्षा व मतदार उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.