Homeकोंकण - ठाणेलिंगनूर कापशी, ता. कागल येथे विविध विकास कामांचे शुभारंभ

लिंगनूर कापशी, ता. कागल येथे विविध विकास कामांचे शुभारंभ

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री ना.हसनसो मुश्रीफ साहेबांच्या फंडातून लिंगनूर कापशी, ता.कागल येथे माजी सरपंच मयुर आवळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पोवारवाडी अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण, गावाअंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण, नविन पाण्याची टाकी, ग्रामपंचायत कार्यालय नविन इमारत, नविन न. पा. यू. योजना, स्मशानभुमी सुशोभिकरण विकास, समाज कल्याण विकास निधी अश्या विविध विकास कामांचा शुभारंभ आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

     यावेळी सरपंच स्वप्निल कांबळे, बिद्री कारखान्याचे संचालक प्रविण भोसले, कागल तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश शिंदे, मधुकर आवळेकर, आनंदा पोवार, बापूसो पाटील, जी. एल. आवळेकर सर, किरण आवळेकर,गुंडा आवळेकर, उमेश डावरे, बाळू आवळेकर, बाळू पोवार, बाबुराव यादव, संभाजी यादव, पोलिस पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, पदाधिकारी, ग्रामस्थ, युवक व महिला भगिनीं, राष्ट्रवादी पदाधिकारी  उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.