Homeकोंकण - ठाणेछत्रपती युवा ग्रुप उत्तुर वतीने बसस्थानक लोकार्पण सोहळा संपन्न.

छत्रपती युवा ग्रुप उत्तुर वतीने बसस्थानक लोकार्पण सोहळा संपन्न.

आजरा. प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील उत्तूर येथील छत्रपती युवा ग्रुप वतीने सामाजिक बांधिलकी जपत अनेक लोक – उपयोगी उपक्रम राबवले जात आहेत . या उपक्रमाचा भाग म्हणून ग्रुपच्या वर्धापन दिनानिमित्त लक्ष्मी मंदिर उत्तूर येथे उत्तूर व गारगोटी वरील मार्गस्थ प्रवाशी यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था म्हणून बस स्थानक उभे केले आहे. या स्थानकाचा लोकार्पण सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ वैशाली आपटे होत्या. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे, शिरीष देसाई, तुषार घोरपडे, महेश करंबळी, संभाजी वाघरे, सागर वाघरे, संजय धुरे, संजय उत्तुरकर, राजू खोराटे, गंगाधर हराळे व इतर मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अध्यक्ष योगेश भांईगडे यांनी केले स्वागत दिलावर लखाले, गोपी देसाई यांनी केले. यावेळी छत्रपती युवा ग्रुप चे अध्यक्ष श्री. भाईगडे बोलताना म्हणाले छत्रपती युवा ग्रुप चे कार्य असेच कायम ठेवण्यासाठी जेष्टानी आशीर्वाद द्यावा. व सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्य सदैव सुरू ठेवण्याचे सामाजिक कार्यकर्त्यांना, शिवभक्तांना आव्हान केले छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२२ सोहळ्यासाठी सज्ज आहोत. असे सांगितले कार्यक्रमाचे आभार संग्राम घोडके यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.