Homeकोंकण - ठाणेआजरा हायस्कूल आजरा शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात प्रथम.

आजरा हायस्कूल आजरा शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात प्रथम.

आजरा. प्रतिनिधी.

आजरा हायस्कूल आजरा शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात प्रथम पटकावला आहे. सन २०२०/२१ या शैक्षणिक वर्षात १२ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत आजरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले . सदर परीक्षेत आजरा हायस्कूल १९ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसह तालुक्यात प्रथम क्रमांकावर आहे .या परीक्षेत इयत्ता आठवीचे १३ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले आहेत. त्यामध्ये मधुरा मारुती कांबळे, ऋतुराज सुनील कुलकर्णी, रतन आनंद व्हसकोटी , ऋषिकेश प्रकाश गुट्टे , हर्षद राजीव करपे ,हरीश सुखदेव गाडे ,शुभम चंद्रकांत केसरकर, सानिया सुरजकुमार नार्वेकर , वैभवी उदय सरदेसाई ,आयुष अनिल प्रधान ,मीना सुनील कालेकर ,मधुरा अशोक महाजन , अविष्कार आबासाहेब मोहिते या विद्यार्थी विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले असून त्यांना एस बी पाटील यांनी गणित व बुद्धिमत्ता या विषयासाठी तर ए आर व्हसकोटी यानी इंग्रजी विषयासाठी व सौ बी पी पाटील यांनी मराठी विषयासाठी मार्गदर्शन केले .इयत्ता पाचवी साठी आजरा हायस्कूलचे सहा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत राजेश सुधीर पाटील, गतिमा हंबीरराव आडकूर ,अक्षता विजय कांबळे, अनुष्का अनिल निर्मळे ,धनश्री सुहास गोवेकर ,आर्यन अवधूत सबनीस या विद्यार्थ्यांना गणित व बुद्धिमत्ता या विषयासाठी ए एस नाईक ,इंग्रजीसाठी एच् एम् बिरंबोळे तर मराठी साठी सौ . व्ही एच् आडकूरकर यांनी मार्गदर्शन केले. कोरोना काळात शाळा बंद असतानाही वर्षभर सातत्याने मार्गदर्शन करून या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांना शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी येसणे यांचे सहकार्य तर संस्थेचे चेअरमन अशोक चराटी यांची प्रेरणा मिळाली. संस्थेचे पदाधिकारी, संचालक, सल्लागार व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने या सर्व शिक्षक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.