कोल्हापूर. प्रतिनिधी. ०७
संपर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत अत्यंत अटीतटीच्या लढतीत नागरी बँका आणि पतसंस्था गटात प्रा. अर्जुन आबिटकर यांनीविजय मिळवला. बँकेचे विद्यमान संचालक अनिल पाटील, आमदार प्रकाश आवाडे पराभूत झाल्याने धक्कादायक विजयाची नोंद झाली आहे.
या गटात विद्यमान संचालक अनिल पाटील, आमदार प्रकाश आवाडे, प्रा. अर्जुन आबिटकर अशी तिरंगी लढत झाली. १२२१ मतदारांपैकी आमदार प्रकाश आवाडे यांना 461मते मिळाली. प्रा. अर्जुन आबिटकरांना 614 तर अनिल पाटील यांना 106 मते मिळाली. आवाडे यांना सत्तारुढ आघाडीत स्थान दिले होते. तर प्रा. आबिटकर हे विरोधी आघाडीतून लढत होते. आबिटकर जिल्हा परिषद सदस्य असून आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू आहेत. अनिल पाटील यांनी मागील निवडणूकीत भाजपकडून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी सत्तारुढ आघाडीतून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती पण आवाडे यांच्या एंट्रीने अनिल पाटील यांचा पत्ता कट झाला.
