आजरा रामतीर्थ यात्रा फक्त धार्मिक कार्यक्रमात होणार संपन्न.- तहसिलदार. – विकास अहिर.
( हॉटेल, स्टॉल, नारळ ,खेळणी, पाळणे, कोणतीही दुकाने लावण्यास बंदी.)
आजरा. प्रतिनिधी.
आजरा येथील महाशिवरात्र दिनानिमित्त होणारी रामतीर्थ यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होते कोल्हापूर जिल्ह्यासह विविध भागातून भक्तजन यात्रेसाठी येत असतात परंतु कोव्हिड १९ या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सालाबाद प्रमाणे होणारी यात्रा ही धार्मिक कार्यक्रमात संपन्न होणार असल्याची माहिती आजरा येथील तहसील कार्यालय येथे नगरपंचायत व तहसीलदार यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सांस्कृतिक पार्श्वभूमी असून जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये गावपातळीवर अनेक यात्रा व उत्सवाचे आयोजन करण्यात येते सध्या कोव्हिड १९ विषाणू संसर्गाचा वाढ होऊ नये या अनुषंगाने यात्रा उत्सव उरूस इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यास बंदी असल्याने आजरा रामतीर्थ यात्रा ही पारंपारिक धार्मिक विधी कमीत कमी मानकरी पुजारी व भाविक यांच्या उपस्थित पूजा करण्याची परवानगी असेल तसेच कोणत्याही प्रकारची यात्रा कोणत्याही प्रकारची दुकाने, स्टॉल लावण्यास बंदी असेल आजरा येथे दि. ११ / १२ रोजी होणारी रामतीर्थ देवाची यात्रा यावर्षी रद्द करण्यात आलेली आहे. भाविक भक्तांनी आजरा रामतीर्थ येथे कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये व सासरा आदेशाचे पालन करावे असे आवाहन आजरा नगरपंचायत व प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अन्यथा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास कलम ४३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या बैठकीला नगराध्यक्षा जोत्सत्ना चराठी, उपनगराध्यक्ष विलास नाईक, नगरसेविका संजीवनी सावंत शकुंतला सलामवाडे, नगरसेवक संभाजी पाटील, आनंदा कुंभार सह नगरपंचायत व तहसील कार्यालय अधिकारी उपस्थित होते.
