तर फेब्रवारी-मार्चमध्ये कोरोना रूग्ण संख्येत वाढ होण्याची आरोग्यमंत्र्यांनी देखील शक्यता वर्तवली आहे.
मुंबई – प्रतिनिधी.
राज्यातील कोरोना संसर्ग ओटोक्यात आल्याचं बोललं जात असताना, आता पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात आढळलेल्या नवीन कोरोनाबाधितांची संख्याही 2 हजारांच्याही पुढे गेल्याचे दिसून आले आहे. तर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील आज फेब्रवारी-मार्चमध्ये कोरोना रूग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
राज्यभरात आज दिवसभरात २ हजार १७२ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, १ हजार ९८ रूग्ण कोरोनामुक्त झाले. तर, २२ कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ६५,०४,८३१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.६५ टक्के एवढे झाले आहे.
आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,६१,४८६ झाली आहे. तर, आजपर्यंत राज्यात १४१४७६ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,८६,४५,५१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,६१,४८६ (९.७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,११,२३२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९१० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ११,४९२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
