आजरा. प्रतिनिधी.
आजरा येथील आजरा सहकारी साखर कारखान्यात चालू गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये उत्पादित झालेल्या १ लाख ५१ हजाराव्या साखर पोत्यांचे पूजन कारखान्याचे हजेरी पटावरील पहिले कामगार निवृत्ती जानबा जाधव यांच्या सुविद्य पत्नी सौ नंदा निवृत्ती जाधव यांच्या शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन सुनील शिंत्रे व सर्व संचालक यांच्या उपस्थित साखरपैती पूजन कार्यक्रम संपन्न झाला.
आजरा साखर कारखान्यात या गळीत हंगामात ४९ दिवसात १३४२६० मे. टन उसाचे गाळप करुन १ लाख ५१ लाख ६०० मे टन साखरचे उत्पादन झाले असून सरासरी ११.२८ टक्के इतका साखर उतारा प्राप्त झाला आहे यावेळी कारखान्याचे चेअरमन सुनील शिंत्रे यांनी कारखान्याचे गाळप नियोजनाप्रमाणे व्यवस्थित सुरू असून या गळीत हंगामात किमान ४ लाख टन गाळप करण्यासाठी योग्य नियोजन संचालक मंडळाने केले आहे तसेच सर्व कारखान्याचे बरोबरीने प्रतिटन २९०० शे रुपये प्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वेळच्या वेळी पाठविण्यात आले आहे. तसेच तोडणी वाहतूक यंत्रणेची बिलेही देण्यात आलेले आहेत. येथून पुढेही येणाऱ्या उसाच्या बिलेही वेळेत अदा करण्याचे नियोजन संचालक मंडळाने केले आहे. कारखान्याकडे नोंदविला संपूर्ण ऊस आणण्याची जबाबदारी ही कारखाना व्यवस्थापना प्रमाणे चालु आहे. आणि त्याचे संपूर्ण नियोजन त्यासाठी तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला संपूर्ण ऊस आजरा कारखान्याचे पुरवठा करून सहकार्य करावे. अशी विनंती केली आहे. या कार्यक्रमास कारखान्याचे व्हा. चेअरमन अनंदराव कुलकर्णी, संचालक विष्णू केसरकर वसंतराव धुरे अंजना रेडेकर मुकुंदराव देसाई दिगंबर देसाई सुधीर देसाई, मारुती घोरपडे, मधुकर देसाई, सुनिता रेडेकर, विजयालक्ष्मी देसाई, लक्ष्मण गुडुळकर, मलिककुमार बुरुड अनिल फडके, आनंदा कांबळे तानाजी देसाई तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक डी.ए.भोसले जनरल मॅनेजर व्हि. एच. गुजर प्रॉडक्शन मॅनेजर एस. के. सावंत, व्हि. के. ज्योती शेतकरी अधिकारी एस. आर. चौगुले आदी खातेप्रमुख कर्मचारी व ठेकेदार उपस्थित होते.
