Homeकोंकण - ठाणेचेअरमन श्रीमती अन्नपूर्णा चराटी, मुख्याध्यापक संजय देवकर यांचा सत्कार.

चेअरमन श्रीमती अन्नपूर्णा चराटी, मुख्याध्यापक संजय देवकर यांचा सत्कार.

आजरा. प्रतिनिधी.

आजरा येथील शिक्षणतपस्वी जे. पी. नाईक नागरी सहकारी पतसंस्था येथे श्रीमती अन्नपूर्णा चराटी यांची अण्णाभाऊ आजरा तालुका शेतकरी सहकारी सूत गिरणी या देशपातळीवरील विख्यात सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार अर्पणा उपासे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दाबिल हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय दिवेकर यांचाही सत्कार ज्येष्ठ संचालक कृष्णा येसणे यांच्या हस्ते करण्यात आला गडहिंग्लज मुख्याध्यापक संघाने संजय देवकर यांच्या त्यांच्या स्वच्छ व सुंदर आदर्श माध्यमिक शाळा बद्दल गौरव केला मुख्याध्यापक म्हणून त्याने अनेक वर्षे दहावीचा निकाल शंभर टक्के लावण्याची परंपरा कायम राखली आहे सहकारी शिक्षण सेवक यांच्या सहकार्याने त्यांनी हायस्कूलच्या इमारतीचे बांधकाम केले आहे या सत्कार समारंभाला वेळी संस्थेचे चेअरमन प्रा. डॉ. शिवशंकर उपासे संचालक श्रावण जाधव, रवींद्र देसाई, नंदकुमार पाटील, शिवाजी बिद्रे, मुग्धा चराठी उपस्थित होते. समारंभाचे आयोजन संतोष जाधव संजय तेजम, सुभाष पाटील यांनी केले आभार श्री जाधव यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.