Homeकोंकण - ठाणेआजऱ्यात एसटीची सेवा सुरळीत चालु व्हावी . या मागणीसाठी भाजप, मनसे, व...

आजऱ्यात एसटीची सेवा सुरळीत चालु व्हावी . या मागणीसाठी भाजप, मनसे, व प्रवासी यांचे तहसीलदारांना निवेदन

आजरा. प्रतिनिधी. २०.

महाराष्ट्र राज्यामध्ये ऐन दिवाळी पासून जो एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे.. त्यावर आज एक महिना दहा दिवस उलटून देखील दोडगा निघाला नाही आहे. राज्यामध्ये सर्व महाविद्यालय, शाळा तसेच सर्व व्यवहार सुरळीत चालू आहेत पण गोरगरिबांची लाल परी एस. टी. वाहतूक बंद असेलमुळे गोर गरीब जनता, प्रवाशी तसेच विद्यार्थ्यांचे वाहतुकी मुले प्रचंड हाल होत आहेत. राज्य सरकारने एस. टी.कर्मचाऱ्यांच्या मागणीचा योग्य तो विचार करून लवकर निर्णय घ्यावा आणि चालू असणारा संप लवकरात लवकर मिटवावा. आणि महाराष्ट्रातील जनतेचे, शालेय विद्यार्थ्यांचे हाल थांबवावेत..
या मागणी करिता आज सोमवार दि. २० डिसेंबर रोजी सकाळी छ. शिवाजी महाराज स्मारक आजरा पासून आजरा तहसील कार्यालय पर्यंत आक्रोश मोर्चा काढून मा. तहसीलदार आजरा यांना प्रवाशी संघटना आणि सर्व प्रवाशी नागरिक यांच्यातर्फे लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी देवर्डे चे माजी उप सभापती कांबळे , मनसे उपाध्यक्ष आनंदा घंटे , भा ज पा नगरसेविका सौ. शुभदा जोशी, मनसे महिला उपाध्यक्ष पुनम भादवणकर, प्रवाशी संघटनेचे आणि भा ज पा पदाधिकारी मा. सचिन इंदलकर कामगार संघटनेचे श्री. मुंढे, भा ज पा तालुका अध्यक्ष सुधीर कुंभार यांची भाषणे झाली. यावेळी आजरा तालुक्यातील सर्व विद्यार्थी, प्रवाशी बांधव, नागरिक, भारतीय जनता पार्टी आणि महारष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.