बेळगाव प्रतिनिधी.
शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे यांना कर्नाटक पोलिसांनी बेळगावला जाण्यापासून कर्नाटक सीमेवरच रोखले…
आज दि. १३ रोजी कर्नाटक विधानसभेचे बेळगाव येथे हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होत आहे. यामुळे बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन केले आहे.या महामेळाव्याला शिवसेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय देवणे हे देखील बेळगावला जाण्यासाठी कोल्हापूरहून निघाले होते.कोगनोळी तालुका निपाणी येथील सीमा तपासणी नाक्यावर येताच कर्नाटक पोलिसांनी शिवसेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांना बेळगाव मधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला जाण्यापासून रोखले असून त्यांना पुन्हा महाराष्ट्राच्या हद्दीत पोलीस बंदोबस्तात सोडण्यात आले.
आज सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान विजय देवणे हे बेळगावला जाण्यास निघाले होते. ही माहिती समजताच निपाणी मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, ग्रामीण उपनिरीक्षक अनिल कुंभार, शहर पोलीस उपनिरीक्षक कृष्णवेणी, बसवेश्वर पोलीस उपनिरीक्षक आनंद घ्यारकट्टी, सहाय्यक फौजदार एस ए टोलगी, सहाय्यक फौजदार कंभार यांच्यासह अनेक कर्नाटक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाली होते.
राहुल लक्ष्मण मेस्त्री. मु.पो.कोगनोळी ता.चिक्कोडी, जि.बेळगाव(कर्नाटक). मी महाव्हाँईस न्युजसाठी गेली सव्वा वर्षे कोल्हापूर-बेळगाव सिमाभागात प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. मी एका सामान्य कुटुंबातुन असुन मला पत्रकारिता करण्याची आवड होती. ती संधी मला आपले संपादक गजानन गवई सर यांनी दिली.