मुंबई. प्रतिनिधी. १३
राज्यात गेल्या दीड महिन्यापासून एस. टि कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी बेमुदत संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई टाळण्यासाठी सोमवार ही शेवटची संधी आहे आतापर्यंत महामंडळाने तब्बल १० हजार १८० कर्मचारी निलंबित केले आहे. रोजंदारीवरील २ हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती केली आहे २ हजार २५० बदली केली आहे. वेतनवाढी देऊनही कर्मचारी संपावर ठाम असल्याने एसटीने कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्याची तयारी सरकारने खुली ठेवली आहेत. मात्र संपा कडून कोणताही ठोस प्रस्ताव सरकारकडे जात नसल्याने कोंडी फुटलेली नाही. महामंडळाने प्रत्येक विभागातील कामगारांना न्यायालयात हा संप बेकायदेशीर ठरवण्यासाठी याचिका दाखल केली आहे. न्यायालय संप बेकायदेशीर ठरविल्यास कर्मचाऱ्यांवर सध्या जी कारवाई मंडळामार्फेत झाली आहे. ती कायदेशीर ठरु शकते.
[आज अखेर कारवाई. = एकूण बदली. – २,२५०
एकूण निलंबित. – १०,१८०
एकूण सेवा समाप्ती. -२.०२९.
अशी कारवाई आहे. ]