आजरा. प्रतिनिधी.
आजरा येथील खेडे मुंगूसवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी प्रकाश श्रीपती चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उप. सरपंच निवडीच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती शारदा सावंत होत्या. उपसरपंच संगीता शिंदे यांनी राजीनामा दिलेनंतर रिक्त पदावर श्री. चव्हाण यांची निवड करण्यात आली. चव्हाण यांचा एकमेव अर्ज आला होता. यामुळे बिनविरोध निवड करण्यात आली निवडीचे काम ग्रामसेवक सचिन गुरव यांनी पाहिले. यावेळी सुचक सदस्य विजय पालकर होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप कोळी, श्रीपती नरके, शोभा लकमले, स्मिता गोडसे, ज्योती सावरकर, सह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपसरपंच श्री. चव्हाण बोलताना म्हणाले मला खेडे मुंगूसवाडी ग्रुप ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदावर काम करण्यास संधी दिली आहे. या माध्यमातून मी गावाच्या विकासासाठी प्रयत्न करेल असे बोलताना म्हणाले. सदस्य श्री कोळी यांनी आभार मानले.
