Homeकोंकण - ठाणेएर्नाकुलम ओखा एक्सप्रेसमधील महिला प्रवाशाचे सव्वा पाच लाख रूपये किमतीचे दागिने आणि...

एर्नाकुलम ओखा एक्सप्रेसमधील महिला प्रवाशाचे सव्वा पाच लाख रूपये किमतीचे दागिने आणि रोकड लंपास. ( रत्नागिरी स्टेशनजवळ रेल्वे ‘स्लो’ होताच हा ऐवज असलेली पर्स महिलेच्या हातातून खेचून घेऊन चालत्या रेल्वेतून उडी टाकुन चोरटा पळाला.)

रत्नागिरी. प्रतिनिधी. ०७

एर्नाकुलम ओखा एक्सप्रेसमधुन गावी येणाऱ्या महिला प्रवाशाचे सव्वा पाच लाख रूपये किमतीचे दागिने आणि ९,००० हजाराची रोकड अज्ञात चोरट्याने लुबाडून नेल्याची खळबळजनक घटना मंगळवारी पहाटे ५ वा.च्या सुमारास घडली. रत्नागिरी स्टेशनजवळ रेल्वे ‘स्लो’ होताच हा ऐवज असलेली पर्स महिलेच्या हातातून खेचून घेऊन चालत्या रेल्वेतून उडी टाकुन चोरटा पळाला. महिला प्रवाशी प्रतिभा प्रभाकर तळेकर (६०) रा. फोंडाघाट गडगेसखलवाडी यांनी याबाबत कणकवली पोलिसात तक्रार दाखल केली आहे.ही जबर लुटीची घटना घडल्यावर प्रतिभा तळेकर यांनी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर तक्रार देण्याचा प्रयत्न केला. परंतु रेल्वे स्थानकात त्यावेळी स्टेशनवर पोलिस व टीसीही नव्हते. शेवटी महिलेने कणकवलीत येऊन तक्रार नोंदविली.

प्रतिभा तळेकर आपल्या फिर्यादित म्हणतात, त्या, त्यांचे पती व भाऊ दत्ताराम सोबत ओखा एक्सप्रेस ने गावी येत होत्या. रत्नागिरी स्टेशनजवळ येताच ट्रेन ‘स्लो’ झाली त्यावेळी अनोळखी इसम त्यांच्या सिटच्या बाजुला येऊन उभा राहिला. ट्रेनचा वेग आणखी कमी झाल्यावर ‘त्या’ अनोळखी चोरट्याने ‘त्या’ महिलेच्या हातातील ‘लाल रंगाची’ पर्स खेचुन घेतली आणि ‘तो’ पळत असताना त्यांनी पकडण्याचा पयत्न केला. परंतु ‘तो’ निसटला. त्याने चालत्या गाडीतून उडी टाकून ‘तो’ पसार झाला. यावेळी त्यांनी आरडा-ओरड केल्याने इतर प्रवाशांनीही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता.

१ लाख ७० हजार रूपये किमतीचे ४ तोळ वजनाचे सोन्याची साखळी असलेले तीन पदरी सोन्याचे मंगळसुत्र, २० हजार रूपये किमतीची लाल खडा असलेली अर्धा तोळे वजनाची सोन्याची अंगठी, २० हजार रूपये किमतीची दुसरी चौकोनी प्लेन अंगठी, ३५०० रूपयाची लहान मुलाची अंगठी, १ लाख ३० हजार रूपये किमतीच्या दिड-दिड तोळयाच्या दोन चैन, १४० हजार रूपये किमतीच्या अडिज तोळयाचा ३ पदरी सोन्याचा हार, २० हजार रूपये किमतीचे कुड्यासहीत झुमके, १५ हजार रूपये किमतीची नथ व रोख रक्कम ९ हजार रूपये असा ऐवज ‘त्या’ चोरून नेलेल्या पर्समध्ये होता.चोरीची ही घटना रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसरात घडल्याने अधिक तपासासाठी हा गुन्हा ‘शुन्य’ नंबरने रत्नागिरी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.