Homeकोंकण - ठाणेअवकाळी पावसाने मुंबईला झोडपले;- जोरदार पावसाची शक्यता

अवकाळी पावसाने मुंबईला झोडपले;- जोरदार पावसाची शक्यता

मुंबई :- प्रतिनिधी. ०१

थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना सकाळपासूनच पावसाच्या हलक्या सरींचा अनुभव घ्यावा लागला. अवकाळी पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडवली.

बुधवारी सकाळपासून मुंबईसह उपनगरांत पावसाने हजेरी लावल्याने अनेकांना छत्र्या बाहेर काढाव्या लागल्या. पुढील दोन दिवसांत मुंबईसह आजूबाजूच्या शहरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होईल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी वातावरणात गारवा निर्माण झाल्याने मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा होती. मात्र अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबई, ठाणे, धुळे आणि पालघरमध्ये हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला होता. पुढील 24 तासांसाठी मुंबई, ठाण्यात यलो अलर्ट तर पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला असल्याची माहिती मुंबई हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिली.

बुधवारी सकाळपासून आकाशात ढग दाटून आले आणि पावसाळा सुरुवात झाली. छत्री किंवा रेनकोट शिवाय बाहेर पडलेल्या मुंबईकरांची तारांबळ उडाली. मुंबई व उपनगरांत पावसाने हजेरी लावत दिवसभर रिपरिप चालू ठेवली.त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. तरुणाईने चौपाट्या, समुद्र किना-यावर रिमझिम पावसात आनंद लुटला. दक्षिण-पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव, लक्षद्वीपच्या जवळ चक्रीवादळ आहे. यामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो कच्छ पर्यंत पसरला आहे. पुढील 24 तास मुंबईसह मध्य महाराष्ट्र, कोकणा मध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.