Homeकोंकण - ठाणेएसटी संप :- परीवहन मंत्री अनिल परब आणि उच्च आणि तंत्र शिक्षण...

एसटी संप :- परीवहन मंत्री अनिल परब आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ, संप मागे घेण्याची परिवहन मंत्र्यांची विनंती

संपातून तोडगा काढण्यात ना. उदय सामंत यांची मोठी भूमिका

मुंबई:-प्रतिनिधी.२४

परीवहन मंत्री अनिल परब आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबतची बैठक संपवुन आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी एच एन रिलायंन्स हाँस्पिटलमध्ये गेले होते. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मंत्री अनिल परब आणि उदय सामंत यांची या प्रकरणी विस्तृत चर्चा झाली आहे. आता सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद घेऊन सरकारची भूमिका मांडली आहे.

गेल्या १४ दिवसांपासून एसटी कामगारांचा संप चालू आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार समिती जो निर्णय घेईल तो सरकारला मान्य

कर्मचाऱ्याच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय, मुळ पगारात करण्यात येणार वाढ

चर्चेमध्ये तिढा सोडवण्यासाठी ना. उदय सामंत यांची महत्वाची भूमिका

१ ते १० वर्ष सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनात ५ हजार रुपयांची वाढ, ४१ टक्के करण्यात आली वाढ

१० ते २० वर्षापर्यंत सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्याच्या मुळ वेतनात ४ हजार रुपयांची वाढ आता त्यांचा पगार २८ हजार ८०० रुपये होणार

२० वर्षांपेक्षा जास्त सेवा असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता ४१ हजार रुपये पगार मिळणार

कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात भरगोस वाढ

दिवसभराच्या चर्चेतील फलित

राज्य शासनाने कोरोना काळात २७०० कोटींची रक्कम पगारासाठी दिले.

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आता यापुढे प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपूर्वी होणार

एसटीचे उत्पन्न वाढलं तर कर्मचाऱ्याना प्रोत्साहनपर भत्ता मिळणार

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे मोठे मार्गदर्शन

संप मागे घेण्याची करण्यात आली विनंती

कामगारांनी लवकरात लवकर कामावर रुजू व्हावे

तात्काळ हजर होणाऱ्या कामगारांचे निलंबन रद्द करण्यात येणार

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.