Homeकोंकण - ठाणे"आमदार आपल्या दारी" उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद आ . चंद्रिकापुरे यांनी जाणून घेतल्या...

“आमदार आपल्या दारी” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद आ . चंद्रिकापुरे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या.

सडक अर्जुनी . प्रतिनिधी.

‘ आमदार आपल्या दारी ‘ या उपक्रमाअंतर्गत आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी सडक/अर्जुनी नगरातील विविध प्रभागात प्रत्यक्ष भेट दिली . काल दिनांक . २२ ला प्रभाग क्र . १० ते १७ मधील नागरिकांशी थेट संपर्क साधला व नागरिकांशी चर्चा करून समस्या अवगत करुन घेतल्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
प्रभागातील पिण्याच्या पाण्याची समस्या असेल तिथे काय उपाययोजना करता येईल याविषयी चर्चा केली . रस्ते नाली , विधवा , वृद्ध महिला पुरुष , निराधार व्यक्तीचे पेन्शन आदि विविध विषयावर चर्चा केली . घरकुलाची समस्या जाणुन घेतली, नगरपंचायत अंतर्गत रखडलेले घरकुलाचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वानसन नगरीकांना दिले . प्रभागातील काही ठिकाणी विधंन विहीर मंजूर करून समस्या सोडविली जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी आ . मनोहर चंद्रिकापुरे यांचे सोबत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार , महिला अध्यक्ष रजनी गिहेपुंजे , माजी जि . प . उपाध्यक्ष छायाताई चव्हान,माजी नगराध्यक्ष देवचंद तरोगे , राष्ट्रवादी किसान सभेचे अध्यक्ष एफ.आर. टी .शहा , राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शहर अध्यक्ष प्रियंक उजवणे , वंदना डोंगरवार , मतीन शेख , अतुल फुले , सुबुर सौदागर , मोहनकुमार शर्मा ,सुनीता शर्मा , आनंदकुमार अग्रवाल , फारुख शेख , सदाराम लाडे , समीक्षा उदापुरे , आशिष येरणे , बंटी सय्याम , अमीन शेख , जया मसराम , दिक्षा भगत , इंजि. कापगते , पत्रकार बिरला गनवीर, राजेश मुनिश्वर , आकीब पटेल , कामीनी कोवे , भाग्यश्री सयाम,चंदा मेघराज, प्रभागातील नागरिक उपस्थित होते .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.