Homeकोंकण - ठाणेविद्यामंदिर सरोळी" शाळेची होत असलेली दुरवस्थेसाठी ५० हजाराची मदत. - मनसे जनहित...

विद्यामंदिर सरोळी” शाळेची होत असलेली दुरवस्थेसाठी ५० हजाराची मदत. – मनसे जनहित व विधी कक्ष जिल्हाध्यक्ष परशुराम बामणे.

गडहिंग्लज. प्रतिनिधी. १८

गडहिंग्लज सरोळी येथील विद्यामंदिर येथे मराठी भाषा व मराठी शाळा टिकली पाहिजेच पण ती टिकवण्याची नैतिक जबाबदारी मराठी माणूस म्हणून आपली देखील आहे. म्हणूनच गडहिंग्लज तालुक्यातील सरोळी गावातील “विद्यामंदिर सरोळी” शाळेची होत असलेली दुरवस्था लक्षात घेऊन कोल्हापूर मनसे जनहित व विधी कक्ष जिल्हाध्यक्ष परशुराम बामणे भाऊजी यांनी शाळेच्या दुरुस्तीसाठी रोख पन्नास हजार रुपये शाळेच्या आजी-माजी कमिटीकडे सुपूर्द केली.
त्यासोबत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज व समाजसेवक महात्मा जोतिबा फुले यांची फोटो प्रतिमा शाळेस भेट दिली.
कोल्हापूर ग्रामीण मधील मराठी शाळांची होणारी दुरवस्था व शासनाकडून होणारी कुचंबना लक्षात घेऊन शासनाकडे पाठपुरावा करून मराठी शाळांना शासनातर्फे योग्य सहकार्य मिळावे,यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे मनसे जनहित जिल्हाध्यक्ष श्री.बामणे म्हणाले.यावेळी उपाध्यक्ष, रवींद्र जांबोटकर, सरपंच मारुती पाटील, सचिव, आशिष पाटील उप. सरपंच प्रभाकर पाटील कमिटीचे सल्लागार रवळू पाटील सर कमिटी सदस्य प्रवीण पाटील, युवराज पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका कमल देसाई, शिक्षिका सीमा पाटील अंगणवाडी शिक्षिका मंगल पाटील शिक्षक सुतार सर टकेकर सर आणि रामचंद्र शिंदे सर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.