Homeकोंकण - ठाणेविधान परिषदेच्या रणधुमाळीला सुरुवात.- महाडिक विरुद्ध पाटील रणधुमाळी सुरू.

विधान परिषदेच्या रणधुमाळीला सुरुवात.- महाडिक विरुद्ध पाटील रणधुमाळी सुरू.

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी.

होऊ घातलेली विधान परिषद निवडणुकीमध्ये माजी आमदार अमल महाडिक गृहमंत्री सतेज पाटील. थेट लढत होणार आहे. राजकीय कट्टर विरोधक एकमेका समोर उभे असल्याने या विधान परिषद निवडणुकीला रंगत येणार आहे. एकुनच काटे की टक्कर होणार आहे. दोन्ही उमेदवार ताकतीचे असल्याने मतदारावर लक्ष ठेवणारी यंत्रणा दोन्ही उमेदार यांच्याकडे मजबूत आहे.
कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजुन आता जिल्ह्यात राजकीय जोडण्या लावण्यास वेग येत आहे. मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधून एक गठ्ठा मतांची बेगमी करण्यासाठी हालचाली गतिमान होणार आहेत. निर्णायक मते असणाऱ्या तालुक्यांवर विशेष लक्ष देऊन फिल्डिंग लावण्यासाठी यंत्रणा तयार ठेवली आहे.
हातकणंगले, शिरोळ, कागल, करवीर आणि पन्हाळा या तालुक्यात मतदारांची संख्या जास्त असून विजयामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असेल. यामध्ये.

हातकणंगले –

हातकणंगले तालुक्यात इचलकरंजी नगरपालिका ६१, वडगाव नगरपालिका १७, हुपरी नगरपरिषद १८, हातकणंगले नगर परिषद १७ आणि जिल्हा परिषद सदस्य ११ असे एकूण १२५ मते आहेत.

शिरोळ –

शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर, शिरोळ, कुरूंदवाड, जिल्हा परिषद सदस्य, पं. स. सभापती अशी मिळून एकूण ७१ मते आहेत.

कागल –

तालुक्यात कागल नगरपालिका ४१, जिल्हा परिषद सदस्य ५ व पंचायत समिती सभापती १ अशी एकूण ४७ मते आहेत.

गडहिंग्लज –

गडहिंग्लजमध्ये नगरसेवक, जि. प. सदस्य, पंचायत समिती सभापती असे एकूण २५ मतदार आहेत.

पन्हाळा –

पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेचे १८ नगरसेवक, तर जिल्हा परिषद सदस्य ५ आणि पं. स. सभापती १ असे एकूण २४ मतदार आहेत.

शाहूवाडी –

मलकापूर नगरपालिकेचे १९ नगरसेवक, जिल्हा परिषदेचे ४ सदस्य आणि पं. स. सभापती १ असे एकूण २४ मतदार आहेत.

चंदगड –

नगरपंचायतीत १७ नगरसेवक आहेत. जिल्हा परिषद सदस्य ४ पं.स. सभापती १ असे २२ मतदार आहेत.

आजरा –

तालुक्यात नगरपंचायतीत १८ नगरसेवक आहेत. जिल्हा परिषदेचे ३ सदस्य पंचायत समिती सभापती १ असे एकूण २२ मतदार संख्या आहे.

करवीर –

करवीर तालुक्यातून १२ मतदार मतदानासाठी पात्र आहेत.

राधानगरी –

राधानगरी तालुक्यात ६ मतदार आहेत.

भुदरगड –

भुदरगड तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य ४ आणि पंचायत समिती सभापती १ अशी एकूण ५ मते आहेत.

गगनबावडा –

गगनबावडा तालुक्यात जिल्हा परिषदेचे २ सदस्य व पंचायत समिती सभापती असे एकूण ३ मतदार आहेत.
एकूणच मतदान पैकी कोणाकडे किती मतदार आहेत ही बेरजेची गणिते उमेदवाराकडे असतीलच. पण प्रत्यक्षात निकालानंतर पाहायला मिळेल विजय कोणाचा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.