मुंबई. प्रतिनिधी. १५
देशमुखांना जामीन मिळावा म्हणून त्यांचे वकील इंदरपाल सिंग यांनी कोर्टासमोर युक्तिवाद केला. देशमुख ईडीला सहकार्य करत असल्याने त्यांना जामीन मिळायला हवा, असा युक्तिवाद सिंग यांनी केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर ईडीच्या वकिलांनी देशमुख यांच्या जामिनाला विरोध करत त्यांना कोठडी देण्याची मागणी केली होती. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर देशमुख यांना १५ नोव्हेंबरपर्यंतची ईडी कोठडी सुनावली होती. त्यामुळे आता अनिल देशमुख यांना जामीन मिळणार का? हे पाहावं लागणार आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाने दिलेल्या न्यायलयीन कोठडीला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानं पुन्हा ईडी कोठडीत जावं लागलं होतं. मुंबई हायकोर्टानं अनिल देशमुख यांनी 12 नोव्हेंबरपर्यंत सुनावलेली ईडी कोठडी 15 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती त्याची मुदत संपणार आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांना जामीन मिळणार का? हे पाहावं लागणार आहे.
