मुंबई. प्रतिनिधी. ०८.
राज्यात सुरु असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने आता राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारने आता अन्य वाहनांनाही प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे.
शासनाचा नवा निर्णय लागू झाला आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर हा निर्णय रद्द होईल, असेही शासनाकडून सांगण्यात आले आहे.
कोणत्या वाहनांना परवानगी?:
शालेय बस, कंपनीच्या बस आणि खासगी बससह मालवाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांना प्रवाशांची ने आण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे तब्बल 20-25 हजार बस प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध होणार होणार आहेत.