आजरा. प्रतिनिधी. ०८
नेसरी पंचक्रोशीतील जनतेच्या सेवेसाठी आजरा अर्बन बँकेने ए. टी. एम. सुरू केले असून या सेंटरचा शुभारंभ अण्णा भाऊ संस्था समुह प्रमुख अशोक चराटी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच नेसरी येथील श्री. वीरशैव को. आॉफ. बॅकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक माजी सरपंच महादेव साखरे यांचे हस्ते करण्यात आले. नेसरी व परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी बँकेने ए. टी. एम ची सोय केली आहे. बॅंकेला लवकरच शेड्युल दर्जा प्राप्त करणेसाठी प्रयत्न करीत असल्याचे यावेळी सांगितले. या शुभारंभ प्रसंगी चेअरमन सुरेश डांग, डॉ. अनिल देशपांडे, मारुती मोरे, आनंदा फडके, तसेच नेसरी येथील अमर हिडदुगी, श्रीकांत गुंजाटी, शिवाजी पाटील, काशिनाथ शिंत्रे, बबन पाटील, विद्याधर गुरू, सह ठेवीदार सभासद हितचिंतक उपस्थित होते.
[ आजरा अर्बन बँकेकडे दीपावली पाडव्यानिमित्य ४ कोटी ५६ लाखाच्या ठेवी जमा..-
येथील दि आजरा अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड आजरा मल्टीस्टेट या बँकेकडे दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर तब्बल ४ कोटी ५६ लाख १८ हजार ४०० रुपयांच्या ठेवी एका दिवसात जमा झाल्या आहेत. ग्रामीण भागात स्थापन झालेल्या व शहरी भागातही शाखा असणाऱ्या बँकेवर आजही सभासद ठेवीदार व हितचिंतकांच्या दृढ विश्वासामुळे ग्राहकांनी बँकेकडे मोठ्या प्रमाणात ठेवल्या आहेत सध्या बँकेकडे ७०७ कोटी ६६ लाख रुपयांच्या ठेवी व ४३४ कोटी ३७ लाख रुपये कर्ज आहेत. त्याबाबत बँकेचे चेअरमन व संचालक मंडळ यांनी ठेवीदार सर्व सभासद, हितचिंतक यांचे आभार मानले आहेत. व सर्वांना शुभेच्छा दिल्या. ]