Homeकोंकण - ठाणेशतकातील दीर्घ चंद्रग्रहण, भारतात कुठे पाहायला मिळणार? पहा तर फक्त सह्याद्रीवर

शतकातील दीर्घ चंद्रग्रहण, भारतात कुठे पाहायला मिळणार? पहा तर फक्त सह्याद्रीवर

नवी दिल्ली : वृतसंस्था.

अंतराळातील घडामोडींमध्ये रस असणाऱ्या जिज्ञासूंना या महिन्यात एक अनोखी पर्वणीच लाभणार आहे. याच महिन्यात १९ नोव्हेंबर रोजी या शतकातील सर्वात लांबलचक चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2021) पाहण्याची संधी मिळणार आहे. खगोलशास्त्रज्ञांसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे.

दोन आठवड्यानंतर पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान प्रवास करणार आहे. यामुळे चंद्राच्या पृष्ठभाग झाकोळला जाणार आहे.

नासानं दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण चंद्रग्रहण दुपारी १.३० वाजता पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या खगोलीय घटनेदरम्यान चंद्र संपूर्णत: लाल रंगाचा दिसणार आहे. १९ नोव्हेंबर रोजीचं हे चंद्रग्रहण या शतकातील सर्वात दीर्घकालीन चंद्रग्रहण ठरणार आहे.

जगातील वेगवेगळ्या भागांशिवाय भारताच्या अनेक भागांतून नागरिकांना हे चंद्रग्रहण अगदी सहजपणे पाहता येणार आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे चंद्रग्रहण केवळ त्याच ठिकाणांवरून दिसून येईल जिथे चंद्र क्षितिजाहून वर असेल. त्यामुळे, भारतात आसाम आणि अरुणाचल प्रदेश सहीत भारताच्या पूर्वेत्तर राज्यांतील नागरिकांना ही खगोलीय घटना अनुभवता येणार आहे.

याशिवाय, अमेरिकेत सर्व ५० राज्य आणि मेक्सिकोमध्ये राहणारे लोक ही दृश्यं आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकतील. तसंच ऑस्ट्रेलिया, पूर्व आशिया, उत्तर युरोप आणि प्रशांत महासागर क्षेत्रातही दिसणार.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.