Homeकोंकण - ठाणेकेंद्र व राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील .- दिवसभरातील घडामोडी पहा फक्त सह्याद्रीवर.

केंद्र व राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील .- दिवसभरातील घडामोडी पहा फक्त सह्याद्रीवर.

सह्याद्री . वृत्तसंस्था. ०५

💥 केंद्राची इंधनावर शुल्क कपात.- पेट्रोल-डिझेल दरांबाबत आज कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय*

केंद्र सरकारने उत्पादन शुलकात केलेली कपात आणि त्यानंतर जवळपास १४ राज्यांनी इंधनावरील व्हॅट कमी केल्यांनतर पेट्रोल आणि डिझेल दरात प्रचंड घसरण झाली आहे. आज शुक्रवारी पेट्रोलियम कंपन्यांनी दोन्ही इंधन दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपयांची उत्पादन शुल्क कपात केली होती. त्यानंतर मुंबई , दिल्लीत देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी घसरण पहायला मिळाली.आज शुक्रवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल १०३.९७ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपये इतका कमी झाला आहे.

💥 केदारनाथाच्या चरणी PM मोदी; आदि शंकराचार्यांच्या मुर्तीचं केलं अनावरण*

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिवाळीनिमित्त उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे पोहोचले आहेत. पंतप्रधान झाल्यापासून पाचव्यांदा मोदी या ठिकाणी पोहोचले असून या ठिकाणच्या सुप्रसिद्ध केदारनाथ मंदिरात त्यांनी बाबा भोलेनाथाची पूजा केली आहे. त्यानंतर त्यांनी आदि गुरु शंकराचार्यांच्या समाधीचं अनावरण देखील केलं आहे. 2013 साली आलेल्या मोठ्या प्रलयादरम्यान या समाधीचं नुकसान झालं होतं. पंतप्रधान केदारनाथमध्ये सुरु असलेल्या विकासकामांचा देखील आढावा घेणार आहेत. या ठिकाणी पंतप्रधान मोदींनी उपस्थित भक्तगणांसमोर आपलं मनोगत व्यक्त केलं.

❇️ किरीट सोमय्यांवर मानहानीचा दावा दाखल करणार.

“किरीट सोमय्या यांनी आरोप करून काँग्रेसच नव्हे, तर महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे काम सुरू केले आहे . माध्यमांसमोर येऊन खोटे सांगण्याची त्यांना सवय झाली आहे. त्यांनी केलेले सर्व आरोप कपोलकल्पित आहेत. त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत. सातत्याने बिनबुडाचे आरोप करून काँग्रेसची प्रतिमा मलीन करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी”, अशी मागणीही काॅंग्रेसचे मुख्य प्रवक्ते लोंढे यांनी केली. येथे आयाेजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.किरीट सोमय्या यांनी एका राष्ट्रीय चॅनलवर डिबेटमध्ये राज्य सरकारवर आरोप केले होते. त्यावर लोंढे म्हणाले की, “काँग्रेसवर बिनबुडाचे आरोप करून पक्षाला बदनाम करण्यात येत असल्याबद्दल भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे तक्रार केली आहे.”

⭕ महाआघाडी सरकारचे अनेक मंत्री तुरुंगात जाणार!*

“आवाज नाही, धूर नाही असे फटाके आघाडी सरकारचे. धूर न सोडणारे फटाके फक्त महाआघाडी सरकारमध्येच मिळतात. कलाबेन डेलकर यांची निशाणी धनुष्यबाण नव्हे तर फलंदाज ही होती. गद्दारी बनून मुख्यमंत्री बनले. केंद्रात धडक मारायची म्हणतात, पण डोकं ठिकाणावर नाही”, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली.नारायण राणे पत्रकार परिषदेत बोलत होते. राणे पुढे म्हणाले की, “गुणवत्ता नसताना मुख्यमंत्री पदावर टिकवल्यामुळे बारामतीच्या कार्यक्रमांत शरद पवारांचे तोंडभरून कौतुक होत आहे. महाविकास आघाडीतील अनेक मंत्री तुरुंगात जाणार आहेत. सत्ता तुमची असताना राज्यात ड्रग्ज येतातच कशी?”, अशी चौफेर टीका नारायण राणे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.