Homeकोंकण - ठाणेआजरा साखर गळीत हंगाम. - दोन वर्षांनी अड्डा. फुल. - ऊस उत्पादकांनी...

आजरा साखर गळीत हंगाम. – दोन वर्षांनी अड्डा. फुल. – ऊस उत्पादकांनी आपल्या तालुक्यातील कारखान्याला ऊस घालावा. – चेअरमन प्रा. सुनिल शिंत्रे. [ गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास कार्यक्रम पत्रिकेवर नाव न टाकून डावलण्याचा उद्देश नव्हता तरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी. ]

आजरा. प्रतिनिधी. ३०.

आजरा सहकारी साखर कारखाना गेली दोन वर्षे बंद होता. दोन वर्षांनी कारखाना सुरू झाला आहे. व सद्या अड्डा फुल असल्याचे चित्र दिसून येत आहे. आजरा येथील साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ व कारखान्यात कोणतेही राजकारण नसताना विनाकारण झालेले गैरसमज या पार्श्वभूमीवर चेअरमन सुनील शिंत्रे यांनी दि. ३० रोजी माहिती दिली की कारखाना गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमाला नेते जि.प.उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांना कार्यक्रमाला आमंत्रण न देणे किंवा कार्यक्रम पत्रिकेवर नाव न टाकने असा कोणताही उद्देश नव्हता. कार्यक्रम पत्रिकेमध्ये जरी नाव नसले तरी त्यांना वैयक्तिक निमंत्रण देऊन त्यांचा त्या ठिकाणी सत्कार असल्याचे सुचित केले होते. परंतु काही कार्यकर्त्यांच्या पत्रिकेत नाव नसल्याने भावना दुखावल्या असतील तर मी चेअरमन या नात्याने दिलगिरी व्यक्त करतो. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. सर्वांच्या सहकार्यामुळेच हा कारखाना सुरू झाला आहे. अवघ्या अडीच महिन्यात कामगार, सर्व खातेप्रमुख, कार्यकारी संचालक यांनी कारखान्याच्या कामकाजात चांगल्या पद्धतीने लक्ष घालुन कारखान्यात कोणतीही अडचण येणार नाही अशा पद्धतीचे कामकाज ठेवले आहे. तसेच मागील एफ.आर.पी दिली नव्हती. ती पूर्ण दिली आहे. तर इतर राज्यातील, जिल्ह्यातील कारखान्या सोबत २९ शे रुपये एफ. आर. पी इतर कारखाना जाहीर केला आहे. चालू हंगामात तोडणी – ओढणी तसेच एफ आर पी ची अडचण येणार नाही. परंतु यासाठी ऊस उत्पादक सभासदांनी आपल्या तालुक्यातील ऊस आपल्या आजरा कारखान्याला घालावा व सहकार्य करावे. बाहेरील कारखान्यापेक्षा स्वतःच्या कारखान्यास प्राधान्य द्यावे. सद्या कारखान्याकडे १२७ टोळ्या आहेत. आशा एकूण तीन तालुक्यात आहेत. पैकी आजरा मध्ये ४६ टोळ्या सद्या कार्यरत आहेत. आणखी दोन दिवसांनी यामध्ये वाढ होणार आहे. आजरा सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास असल्याने ४ लाख क्रसिंगचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे. आजरा कारखाना सोडून आजरा तालुक्यातील एकही उसाची कांडी बाहेर जाऊ नये याबाबत प्रबोधन करण्यात येईल परंतु स्वतः ऊस उत्पादकांनी निर्णय घेऊन आपल्या आजरा तालुक्यातील शेतकरी यांनी ऊस घालावा व सहकार्य करावे असे शेवटी बोलताना चेअरमन श्री शिंत्रे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.