आजरा. प्रतिनिधी.
आजरा साखरचा उद्या गळीत हंगाम शुभारंभ होणार असून
गाळप हंगाम सन. २०२२/२२ करिता कारखान्याने ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले असून ३३१ ठेकेदारास सोबत ऊस तोडणी वाहतुकीचे करार केलेले आहेत. कारखान्याकडे कारखान्याकडे कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्रा बाहेरील ८ हजार ७०० हेक्टर उसाची नोंद झाली असून कारखाना मशनरी ओअर व्होलिंगचे काम पूर्ण झाले आहे. दि. २५/१०/२०२१ रोजी कारखान्याचा मोळी पूजनाचा कार्यक्रम करून कारखाना प्रत्यक्षात गाळपास सुरुवात करणार आहे. साखर कारखान्यावर या पूर्वीप्रमाणे आजरा तालुका परिसरातील शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून येणारा येणारा गळीत हंगाम आपण संपूर्ण ऊस आपल्या आजरा सहकारी साखर कारखान्यास द्यावा. असे अवाहन चेअरमन व संचालक यांनी केले आहे. हंगाम २०२१/२२ करिता आपल्या येणाऱ्या उसाची बिले नियोजनानुसार देखील नियोजनानुसार वेळेत ऊस उत्पादकांना नियोजन कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सहकाऱ्यांने कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.
या सोहळ्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार संजय मंडलिक शुभास्ते ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्य व पालकमंत्री सतेज पाटील, तसेच प्रमुख उपस्थिती राज्यमंत्री आरोग्य राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी मंत्री विनय कोरे, आम. प्रकाश आबिटकर आम. राजेश पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, भाजप तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर तसेच कारखान्याचे चेअरमन सुनिल शिंत्रे.व्हाईस चेअरमन आनंदराव कुलकर्णी व संचालक मंडळ तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.तानाजी भोसले सह कामगार संघटनेचे अध्यक्ष व सर्व सदस्य सभासद उपस्थित राहणार आहेत.
