Homeकोंकण - ठाणेआर्यन खानच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ.

आर्यन खानच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ.

मुंबई. प्रतिनिधी. २१

मुंबईतील स्पेशल एनसीबी कोर्टाने आज आठ आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढवली. यात आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांचा समावेश आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत ही कोठडी वाढवण्यात आली आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्स किंवा प्रत्यक्ष आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले नाही. ७ ऑक्टोबरला आर्यन खानला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आर्यन खान याला आज हायकोर्टाकडूनही दिलासा मिळाला नाही. त्याच्या जामिन अर्जासाठी वकिलांनी हायकोर्टात धाव घेतली. मात्र यावरची सुनावणी २६ ऑक्टोबरला होणार आहे.मागच्या तीन आठवड्यापासून आर्यन खान तुरुंगात आहे. आज शाहरुख खानने आर्थर रोड कारागृहात जाऊन आर्यनची भेट घेतली. १५ मिनिटांसाठी ही भेट झाली. कारागृहात असताना व्हिडीओ कॉलिंगद्वारे त्याने आई गौरी खान आणि वडील शाहरुख यांच्याशी संवाद साधला होता. मात्र आज पहिल्यांदाच शाहरुख आणि आर्यनची भेट झाली आहे.

ड्रग्ज प्रकरणात आता आर्यनच्या जामिनाचा निर्णय उच्च न्यायालयावर अवलंबून आहे. अन्य आरोपींना भेटण्यासाठी जी प्रक्रिया असते, शाहरुखलाही त्याचेच पालन करावे लागले. शाहरुख कारागृहाच्या आत आला तेव्हा त्याची एण्ट्री कारागृह रजिस्टरमध्ये करण्यात आली. आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे तपासण्यात आली आणि त्यानंतर शाहरुखला टोकनसह आत पाठवण्यात आलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.