Homeकोंकण - ठाणे६५ ठराव धारकांच्या साक्षीने अशोक चराटींचा जिल्हा बँकेत विजयाचा दावा. - जि...

६५ ठराव धारकांच्या साक्षीने अशोक चराटींचा जिल्हा बँकेत विजयाचा दावा. – जि प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा संपन्न.

आजरा. प्रतिनिधी. २०

आजरा येथील आजरा सुतगिरण सभागृहात ६५ ठराव धारकांच्या साक्षीने अशोक चराटींनी जिल्हा बँकेत विजयाचा दावा केला. जि प जयवंतराव शिंपी यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा संपन्न झाला. यावेळी चराटी म्हणाले, जिल्हा पातळीवर सत्ताकेंद्र असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्य जिल्हाचे राजकारण ढवळुन निघाले असताना आजरा येथील यापूर्वीचे पारंपरिक विरोधक जयवंतराव शिंपी यांच्या अध्यक्षतेखाली ठराव धारकांचा मेळावा घेऊन ६५ ठराव धारकांच्या साक्षीने विजयाचा दावा केला. जयवंतराव शिंपी, अशोक चराटी यांना राजकीय वाटचालीस शुभेच्छा देत यापुढील वाटचालीवाटचालीत एकत्र राहण्याचा निर्णय जाहीर केल्याने तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार हे सष्ट आहे. मेळाव्यात बोलताना विद्यमान संचालक अशोक चराटी म्हणाले, राज्य व जिल्हा पातळीवर विकासासाठी विरोधक एकत्र येऊ शकतात तर तालुक्यातील विकासासाठी आपण एकत्र आलो तर बिघडले कुठे? किमान यापुढे तालुक्याच्या विकासाला चालना मिळून गटबाजीचे राजकारण संपुष्टात येईल. तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी म्हणाले, वेळोवेळी आपल्या गटावर अन्याय झाला आहे. गटातटाच्या राजकारणामुळे सामान्य कार्यकर्त्यांचे हाल होताना दिसतात. विकासाचे धोरण समोर ठेवून अशोक चराटी यांच्या पाठीशी राहणार आहे त्यांना विजयी करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला .यावेळी विश्वनाथ करंबळी, जि. प. सदस्या सुनीता रेडेकर, प. स. सदस्य बशीर खेडेकर, माजी सभापती भिकाजी गुरव, नगरसेवक अभिषेक शिंपी, शिवसेनेचे राजेंद्र सावंत, संजय पाटील, तसेच जर्नाधन निऊगरे, उत्तम देसाई यांच्यासह चराटी व शिंपी गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

{१०७ ठराव धारकांपैकी ६५ ठराव धारकांनी मेळाव्यास हजेरी लावून जिल्हा बँक निवडणुकीत चराटी यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. }

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.