आजरा. प्रतिनिधी. ०६
आजरा येथील बसस्थानकासमोर उघड्यावर मटका खेळताना पांडुरंग गणपती मुळीक वय. ४९ , व राजेंद्र भीमराव कुंभार रा. उत्तुर ता. आजरा. जि. कोल्हापूर या दोघांवर मटका खेळताना आजरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये आजरा बसस्थानकासमोर दोन्ही आरोपी कल्याण नावचा मटका लोकांकडून पैसे घेऊन जुगार खेळणे चालवत होते. त्या दोघांकडून जुगाराचे कागद सह १५ शे १२ रुपये त्यांच्या कब्जात असल्याचे मिळुन आले आहेत. कॉ. अनिल तराळ यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला. अधिक तपास एस. के .घस्ती करत आहेत.