आजरा. प्रतिनिधी.
आजरा भाजी मार्केट येथे गांजा सदृश्य अमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी आरोपी बाबाजान हसन माणगांवकर वय. ४५ रा. दर्गा गल्ली. याने आपल्या खोक्यामध्ये हिरवट , पाणे, फुले असलेले ओलसर उग्र गांजा सदृश्य अमली पदार्थ इव्हिडंस कलेक्ट बॅगेमध्ये ३ हजार पाचशे रु किमतीचा ८० ग्रॅम सदृश्य गांजा आढळुन आला आहे.
सदर बॅगेच्या १४ प्लास्टिक पिशवीच्या पारदर्शक पॅकेट करुन लोकट्यात ठेवण्यात आला होतो. सा. फौजदार चंद्रकांत मांगले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. अधिक तपास सपोनि. सुनिल हारगुडे करत आहेत.