Homeकोंकण - ठाणेआजरा साखर कारखान्याचे. - एफ. आर. पी पैकी ऊस बील जमा. -...

आजरा साखर कारखान्याचे. – एफ. आर. पी पैकी ऊस बील जमा. – चेअरमन सुनिल शिंत्रे.( येणाऱ्या गळीत हंगामात ऊस उत्पादकांनी संपूर्ण ऊस आजरा साखर कारखान्यास गाळप करिता पाठवून सहकार्य करावे. संचालक मंडळाचे अवाहन. )

आजरा. प्रतिनिधी.

आजरा येथील आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे सन. २०१८/२०१९ गळती हंगामात गळीतास आणलेल्या ऊसाचे देय बील एफ. आर. पी रकमेपैकी प्र. मे. टन रु. २२६ प्रमाणे एकुण रक्कम ७ कोटी ७ लाख ५३ हजार ८५६ इतकी रक्कम संबंधित ऊस पुरवठाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकतीच वर्ग केली असल्याची माहिती चेअरमन प्रा. सुनील शिंत्रे यांनी दिली.
सन. २०१८/२०१९ गळीत हंगामात आजरा साखर कारखान्याने ३ लाख १३ हजार ६७ मेट्रीक टन उसाचे गाळप केले होते उसाची दे असणारी एफ आर.पी पैकी रक्कम २२६ प्रति मेट्रिक टन याप्रमाणे एकूण रक्कम ७ कोटी ७ लाख ५३ हजार ८५६ रुपये प्रमाणे बँक खात्यावर वर्ग केली आहे संबंधित ऊस पुरवठा धारकांनी बँकेशी संपर्क करावा उर्वरित एफ.आर.पी देय रक्कमही कारखाना गाळप हंगाम सन २०२१-२२ सुरू होण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा येणार आहे. गाळप हंगाम सन २०२१-२२ करिता कारखान्याचे ४०० लाख मे टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले असून ३३० ठेकेदारा सोबत ऊस तोडणी वाहतुकीचे करार केलेले आहेत. कारखान्याने संबंधी तोडणी वाहतूक ठेकेदारांना त्यापोटी रुपये ९ कोटी ९ लाख ॲडव्हान्स रकमेचे वाटप केलेले आहे. तसेच त्यांचे सन २०१८-१९ मधील देय ऊस तोडणी वाहतूक दिले कमिशन सहित होणारी रक्कम रुपये २ कोटी ५० लाख त्यांना आधार केली आहे. कारखान्याकडे ८७०० टन ट्रॅक्टर उसाची नोंद झाली असून कारखाना प्लट अँड मशनरी ओव्हरहोलिंगचे काम अंतिम टप्प्यात आले असून ऑक्‍टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात गळीत हंगाम सुरू करण्याचा संचालक मंडळाने निर्णय केला आहे. आजरा साखर कारखान्यावर यापूर्वी प्रमाणे आजरा गडहिंग्लज चंदगड व सावंतवाडी या तालुक्यातील ऊस पुरवठा धारक शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून येणाऱ्या गळीत हंगामात आपण पिकवलेल्या संपूर्ण ऊस आपल्या आजरा साखर कारखान्यास गाळप करिता पाठवून सहकार्य करावे हंगाम २०२१-२२ करिता आपल्या येणाऱ्या उसाची बिले देखील नियोजनानुसार वेळेत ऊस उत्पादकांना बील अदा करण्याचे नियोजन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार्याने कारखाना व्यवस्थापनाने केले आहे. अशी माहिती आजरा कारखान्याचे चेअरमन श्री. शिंत्रे यांनी दिली यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन आनंदराव कुलकर्णी व सर्व संचालक मंडळ सदस्य आणि कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री तानाजी भोसले उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.