Homeकोंकण - ठाणेजे.पी. नाईक पतसंस्थेचा लाभांश १०.५ टक्के.( कोरोणाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन वार्षिक सभा संपन्न...

जे.पी. नाईक पतसंस्थेचा लाभांश १०.५ टक्के.( कोरोणाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन वार्षिक सभा संपन्न )

आजरा. प्रतिनिधी.

आजरा येथील शिक्षणतपस्वी जे.पी. नाईक नागरिक सह. पतसंस्थेची वार्षिक सभा दि. २९ रोजी ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. शिवशंकर उपासे उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. रवींद्र देसाई यांनी संस्थेचे मयत सभासद सामाजिक साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील निधन पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली ठराव मांडला स्वागत कृष्णा येसने यांनी केले. मागील झालेल्या वार्षिक सभेचे वाचन शासकीय लेखापरीक्षण अहवालाचे दोषदोषदुस्तीसह वाचन मॅनेजर संतोष जाधव यांनी केले. अहवाल सालात संस्थेच्या ठेवी सामान्यत: रु ३३ कोटी गुंतवणुका १२ कोटी कर्ज २५ कोटीची येणी आहेत. खेळते भांडवल ३६ कोटी व वार्षिक उलाढाल ११९ कोटी रुपये इतकी आहे. यावेळी गतसालच्या संस्थेचे अहवालाचे वसुली भाग भांडवल मर्यादा दीड कोटी करून घेण्यासंबंधी आणि संस्थेसाठी घेतलेल्या जागा खरेदीस मान्यता घेऊन पुरवणी इमारत बांधकामास मंजुरी घेण्यासंबंधी चे विषय डॉ. श्री. उपासे यांनी मांडले उपाध्यक्ष सुभाष मोहिते यांनी ताळेबंदी पत्रकाची चर्चा केली शिवाजी बिद्रे यांनी नफा विभागणी मांडली श्रावण जाधव यांनी पुढील सालाचे जमाखर्चाचे अंदाजपत्रक मांडले, संचालक मंडळ येणे कर्जयादीचे वाचन सौ शीतल हरेर यांनी केले सौ सीमा चव्हाण यांनी आभार मानले.
( ऑनलाइन सभेतील चर्चेत गजानन चिगरे, सुधाकर पाटील, राम मधाळे तसेच शिवाजी कांबळे या सभासदांनी सहभाग घेतला सभेचे नियोजन प्रकाश कोठारी संतोष जाधव संजय तेजम व सुभाष पाटील यांनी केले. )

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.