नवी दिल्ली. वृत्तसंस्था.
आता व्हॉट्सअॅप नवं फीचर आणणार आहे. युजर्सला हाय क्वालिटी फोटो पाठवण्यापासून चांगला प्रायव्हसी कंट्रोल मिळणार आहे.
हाय क्वालिटी फोटो व्हॉट्सअॅपवर सध्या जे काही फोटो पाठवले जातात. ते कंप्रेस होऊन कमी साईजचे होतात. त्यासोबत त्या फोटोची क्वालिटीही खराब होते.
युजर्सची हीच समस्या दूर करण्यासाठी व्हॉट्सअॅपवर नवं फीचर येणार आहे. याद्वारे युजर्स फोटो-व्हिडीओ पाठवताना बेस्ट क्वालिटी, डेटा सेवर आणि ऑटो असे पर्याय देणार आहे.
युजर्सची प्रायव्हसी लक्षात घेता, व्हॉट्सअॅपवर Last seen, profile photo आणि status लपवण्याचा पर्याय देण्यात आला आहे. आता My contacts, Everyone आणि Nobody असा पर्याय निवडता येतो.
आता आणखी एक नवा पर्याय येणार आहे. ‘My contacts except’ असा पर्याय येणार असून याद्वारे युजर्स आपले डिटेल्स कोणत्या कॉन्टॅक्टने पाहावे आणि कोणत्या नाही हे ठरवू शकतील.
दरम्यान, स्टिकर्स – व्हॉट्सअॅपवर स्टिकर्स पाठवण्याचा ट्रेंड वाढतो आहे. अशात इन्स्टंट मेसेजिंग अॅपवर नवं फीचर येणार आहे.
लवकरच हे फीचर युजर्ससाठी प्रायव्हसी आणि सिक्योरिटी प्रोटेक्शनच्या अतिरिक्त लेअरला रोलआऊट करण्यास सुरुवात करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
व्हॉट्सअॅपप्रमाणे इतर कोणतीही मेसेजिंग सेवा अशी एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड बॅकअप सुविधा युजर्सच्या सुरक्षेसाठी देऊ शकत नसल्याचंही कंपनीने म्हटलं आहे.