आजरा. प्रतिनिधी.
आजरा सिरसंगी येथील
गेली दोन दशके प्रलंबीत असलेल्या सिरसंगी आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन जि.प.सदस्या सुनिता रमेशराव रेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.यशवंत सोनावणे, जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक अण्णा चराटी, उद्योजक रमेशराव रेडेकर, व्यंकटराव हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य सी.आर.देसाई प्रमुख उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी सरपंच संदीप चौगुले होते.
सिरसंगी ग्रामस्थ गेली दोन दशके आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीसाठी पाठपुरावा करत होते पण यश काही येत नव्हते. जि.प.सदस्या सौ रेडेकर यांनी मागील दोन वर्षे शर्थिने विषेश प्रयत्न करत नवीन इमारतीसाठी ८५लाख रुपयांचा निधी मंजूर करुन आणला.मनोगतात सौ.रेडेकर म्हणाल्या,गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अशोक अण्णांनी विश्र्वास ठेवून मला उमेदवारी दिली व आम्ही निवडुनही आलो.तो विश्र्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. जिल्हा परिषदेच्या साडेचार वर्षांच्या कालावधीत कोळिंद्रे मतदार संघातील प्रत्येक खेड्यापाड्यात जवळपास १३ कोटींचा विकास निधी पोहचवला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. सौ.रेडेकर यांच्या विकासकामाबद्दल समाधानी असल्याचे मत अशोक अण्णांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.ते पुढे म्हणाले येणारी जिल्हा बँकेची निवडणूक ताकदीने लढणार आहे. त्याचबरोबर येणाऱ्या प्रत्येक निवडणुका या संघटीतपणे लढणार आहोत. यावेळी उद्योजक रमेशराव रेडेकर, सी.आर.देसाई, सरपंच संदीप चौगुले यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी आकाराम देसाई, आदीत्य रेडेकर, एम.टी.पाटील, समीर पारदे, संदीप केसरकर, युवराज जाधव, संजय भडांगे यांसह विविध गावचे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत सरपंच संदीप चौगुले यांनी केले,प्रास्ताविक सी.आर.देसाई यांनी केले तर आभार संतोष चौगुले यांनी मानले.
जि.प.सदस्या सौ.सुनिता रेडेकर यांच्या हस्ते सिरसंगी आरोग्य उपकेंद्राचे भुमिपजन सोहळा संपन्न.
RELATED ARTICLES