Homeकोंकण - ठाणे❀ २५ सप्टेंबर ❀नेते कॉम्रेड ए. बी. बर्धन जन्मदिन

❀ २५ सप्टेंबर ❀नेते कॉम्रेड ए. बी. बर्धन जन्मदिन

जन्म – २५ सप्टेंबर १९२४
स्मृती – २ जानेवारी २०१६.

जन्म दिन विशेष.

कम्युनिस्ट नेते कॉम्रेड ए. बी. बर्धन यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२४ रोजी झाला.

अर्धेन्दू भूषण हे ए. बी. बर्धन यांचे पूर्ण नाव. भारतातील कम्युनिस्ट चळवळीतील भीष्माचार्य अशी ओळख होती. बर्धन यांचा जन्म सध्याच्या बांगला देशातील असला तरी त्यांचे वडील नोकरीनिमित्त नागपुरात स्थायिक झाले व बर्धन कुटुंबीय मग नागपूरचेच झाले. त्यामुळे महाराष्ट्राशी त्यांचे निकटचे नाते होते.

सन १९४३ मध्ये विद्यार्थी चळवळी सोबतच कामगार संघटना मध्ये ए.बी. बर्धन काम करू लागले. त्यानंतर उभी हयात त्यांनी सार्वजनिक जीवनातच घालवली. ए.बी. वर्धन कामगार आंदोलन आणि महाराष्ट्रीतील डाव्या राजकारणाचे एक प्रमुख नेते होते.

१९५७ च्या विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते. त्यानंतर ते भारतातील सर्वात जुनी कामगार संघटना असलेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक) चे महासचिव बनले.

आपले राज्य पातळीवरचे राजकारण केल्यानंतर बर्धन ९० च्या दशकात राजधानी दिल्लीत गेले आणि सीपीआयचे उप महासचिव म्हणून काम पाहू लागले. भाकपच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी त्यांनी सलग चार वेळा सांभाळली.

१९९६ मध्ये इंद्रजीत गुप्ता यांच्यानंतर त्यांनी पक्षाच्या महासचिव पदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली.

ए. बी. बर्धन यांचे २ जानेवारी २०१६ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
इंटरनेसंदर्भ : इंटरनेट

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.