नवी दिल्ली. वृत्तसंस्था.
दिल्लीतला मोस्ट वाण्टेड गँगस्टर जितेंद्र उर्फ गोगी याची रोहिणी कोर्टात गोळी झाडून हत्या करण्यात आली. रोहिणी कोर्ट नंबर २ मध्ये जितेंद्रला हजर केलं असता वकिलांच्या वेषात आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळ्या झाडत हत्या केली. जितेंद्रचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी शूटआऊट करत हल्ला करणाऱ्या दोघांना ठार केलं. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून हा एन्काऊंटर करण्यात आला. हल्ला करणारे विरोधी गटातील होते असं सांगितलं जात आहे. शूटआऊटमध्ये एकूण चौघे ठार झाले आहेत.
दिल्लीतील उच्च न्यायालयात झालेल्या गोळीबारात एका गुंडासह आणि इतर तीन जण ठार झाल्याची माहिती आहे समोर आली आहे. या घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत. उत्तर दिल्लीतील रोहिणी येथील कोर्ट कॉम्प्लेक्सच्या आत प्रतिस्पर्धी टोळीने जितेंद्र गोगी या कथित गुंडाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये प्रतिस्पर्धी टोळीचे दोन सदस्यही असल्याचे समजते.