आजरा. प्रतिनिधी.
आजरा वनविभागाच्या वतीने आठवडाभरापूर्वीच घेण्यात आलेल्या बांबू विकास कार्यक्रमात स्थानिक दोन आमदार व पं.स. पदाधिकारी यांना निमंत्रण न दिल्याने सभागृहात पंचायत समिती सभापती उदय पोवार यांच्यासह सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. दि.२३ रोजी आजरा पंचायत समिती मासिक सभा संपन्न झाली. अध्यक्षस्थानी सभापती उदय पवार होते. स्वागत गटविकास अधिकारी बी.डी.वाघ यांनी केले.
श्रध्दांजलीचा ठराव सदस्य शिरीष देसाई यांनी मांडला. या मासिक सभेत जिल्हा आदर्शशिक्षक पुरस्कारप्राप्त प्राप्त शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. वनखात्याने नुकत्याच घेतलेल्या बांबू विकास कार्यक्रमाबाबत खात्याने विभागाचे लोकप्रतिनिधी नाम. हसन मुश्रीफ, आम राजेश पाटील व पंचायत समिती पदाधिकारी यांना निमंत्रण न दिल्याने सभेत आक्षेप घेतला. यापुढे तरी हा शिष्टाचार पाळावा असे सभापती पवार यांनी सुचना केली.
येत्या ८ दिवसात आजरा बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात येणार असल्याची माहिती सभेत यावेळी देण्यात आली आजरा -आंबोली मार्गावर खड्डे पडले आहेत मात्र हा विषय राज्यमार्ग विभागाच्या अंतर्गत येतो. या राजमार्गाचे हस्तांतरण झाले असल्याने किती किलोमीटर मार्गाचे हस्तांतरण झाले ? या मार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारी कोणाची ? भविष्यात रस्त्याचे काम सुरू झाल्यावर होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी कोणाची? असे विविध प्रश्न यावेळी सदस्य शिरीष देसाई यांनी उपस्थित केले अखेर राजमार्ग विभागाला स्वतंत्र पत्र पाठवून याबाबतची माहिती मिळवण्याचे सभेत ठरले शाळा सुरु झाल्यामुळे एसटी महामंडळाने पास सुरु करावेत व शाळांनी विद्यार्थ्यांना बोनाफाइड सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था करावी अशा सूचना या वेळी करण्यात आल्या .
तालुक्यातील काही भागांमध्ये ई पीक प्रक्रियेद्वारे नोंदणी करताना अडचणी येत आहेत अशावेळी कृषी सहायक व तलाठ्यांनी संबंधित शेतकर्यांना आवश्यक ते सहकार्य करावे .जेथे शेतकर्यांच्या अडचणी आहेत त्या ठिकाणी महसूल विभागाने स्वतंत्र यंत्रणा राबवण्याबाबत प्रयत्न करावेत असेही सभापती उदय पवार यांनी सांगितले ग्रामीण भागातून कोव्हिड लसीकरणास अल्प प्रतिसाद असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट करत रुग्ण संख्या घटल्याने आजरा कोविड काळजी केंद्र बंद करण्याच्या आरोग्य विभागाकडून हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात आले यावर आक्षेप घेत सभापती पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत क्विड काळजी केंद्राच्या इमारतीचा ताबा सोडू नका भविष्यात पुन्हा एकवेळ कोव्हिडने डोके वर काढले तर नव्याने सुरुवात करण्याची वेळ येण्याची शक्यताही नाकारता येणार नाही असेही स्पष्ट केले .
आजरा नगरपंचायतीचा नळपाणी पुरवठा योजनेस तांत्रिक मान्यता मिळालेली आहे. परंतु अद्यापही काही त्रुटी असल्यामुळे प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकार्यांनी सांगितले तर तालुक्यातील सर्व पाणी प्रकल्पामध्ये पूर्ण क्षमतेने पाणी साठा असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
यावेळी झालेल्या चर्चेमध्ये सदस्या सौ . रचना होलम सौ . वर्षा कांबळे,गटविकास अधिकारी बी. डी वाघ आदींनी भाग घेतला .
सभेस विविध विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते .
चौकट.
किरीट सोमय्यांच्या निषेधाचा ठराव.
{ शंभर कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप. – आरोप बिनबुडाचे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शंभर कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले असून हे आरोप बिनबुडाचे आहेत. सर्वसामान्यांना सोबत घेऊन काम करणारे नाम. श्री. मुश्रीफ यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने व बिनबुडाचे आरोप केल्याबद्दल भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या निषेधाचा ठराव या सभेत करण्यात आला .}