आजरा : प्रतिनिधी.
पेरणोली ता आजरा येथील युवा भारत सामाजिक,सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षपदी पंकज बाबासाहेब देसाई , उपाध्यक्षपदी शुभम शशिकांत सुतार तर कार्याध्यक्षपदी विक्रम शंकर लोखंडे यांची निवड करण्यात आली.अध्यक्षस्थानी संस्थापक कृष्णा सावंत होते.
यावेळी तरूण,तरूणींचा सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढवणे,रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणे,विधवा,परितक्त्या ,वृद्ध महिला,पुरूषांना पेन्शन मिळवून देणे,तरूणांना उद्योग व व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे आदी निर्णय घेण्यात आले.
यावेळी सचिवपदी -रामचंद्र हळवणकर,खजिनदार-सोपान ढोकरे,सदस्य –संतोष देसाई,निवृत्ती ढोकरे,दयानंद सासूलकर,पार्थ दोरुगडे,महेश सुतार,स्वप्निल सावंत,संदिप कांबळे,महादेव कांबळे,संग्राम येरुडकर,अक्षय पारदे,महादेव सावंत,विक्रम वंजारे,सुनिल हळवणकर,सूरज कोडक,संतोष फगरे,विक्रम वंजारे,एकनाथ देसाई,अमोल कांबळे यांची निवड करण्यात आली.