Homeकोंकण - ठाणेनारायण राणेंच्या विविध रिसॉर्टमधील कर्जाच्या आरोपांवर किरीट सोमैय्या अधिक माहिती देऊ शकतात....

नारायण राणेंच्या विविध रिसॉर्टमधील कर्जाच्या आरोपांवर किरीट सोमैय्या अधिक माहिती देऊ शकतात. – विनायक राऊतांचा टोला

मुंबई. प्रतिनिधी.१०

-कर्जाचे हप्ते भरले नाहीत म्हणून केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी निलम राणे आणि चिरंजीव नितेश राणे यांना लूकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणेंवर खोचक टीका केली आहे. केंद्राच्या गृहखात्याच्या सूचनेवरूनच राज्याच्या गृहखात्याने ही कारवाई केली आहे. हवं तर नितेश राणेंनी दिल्लीत जाऊन माहिती घ्यावी, असा खोचक टोलाही विनायक राऊत यांनी लगावला.

विनायक राऊत यांनी मीडियाशी बोलताना लूकआऊट नोटिसच्या मुद्द्यावरून नितेश राणेंवर टीकास्त्र सोडलं. डिएचएफल फायनान्स कंपनीच्या संचालकांनी या प्रकरणी केंद्राच्या गृहखात्याकडे लेखी तक्रार केली आहे. आमची रक्कम देणं असल्याने या दोघांना देशाबाहेर जावू देवू नका असं या तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या सूचना केंद्र सरकारच्या गृहखात्याने राज्य सरकारच्या गृहखात्याला दिल्या आहेत. याबाबतची अधिक माहिती नितेश राणेंनी दिल्लीत जावून मिळवावी, असा खोचक सल्ला राऊत यांनी दिला.

नारायण राणे भाजपमध्ये येण्यापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही वर्षापूर्वी नितेश राणे यांनी विविध रिसॉर्टसाठी घेतलेल्या कर्जाचा आरोप केला होतो. त्यामुळे याबाबत किरीट सोमय्यांकडून अधिक माहिती मिळू शकेल, असा चिमटा राऊत यांनी काढला. लूकआऊट नोटीसही कायद्यानुसार आहे. जी कारवाई होतेय ती केंद्र सरकारच्या निर्देशाने होतेय, असा दावाही त्यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.