Homeकोंकण - ठाणेखेडे - मुगुसवाडी ग्रामपंचायत सरपंच अविश्वास ठराव मंजूर. अखेर नऊ सदस्यांचा झाला...

खेडे – मुगुसवाडी ग्रामपंचायत सरपंच अविश्वास ठराव मंजूर. अखेर नऊ सदस्यांचा झाला विजय ( अविश्वास ठरावाच्या बाजुने ५७५ मतदान तर ठरावाच्या विरोधात २०५ मते.)

आजरा. प्रतिनिधी.

गेल्या सहा महिन्यापासून विकासकामातील झालेले आरोप या विषयावरुन वादग्रस्त होत. अविश्वास ठरावापंर्यत पोहचलेला वाद न्यायालयात गेला व लोकनियुक्त सरपंच रूपाली आर्दाळकर यांचे विरोधात नऊ सदस्य यांनी दाखल केलेला अविश्वास ठरावाचा दि. ९ रोजी अंतिम दिवस ठरला
आजरा तालुक्यातील ग्रामपंचायत मौजे खेडे – मुगुसवाडी सरपंच यांचे विरोधात अविश्वास ठराव उपसरपंच संगिता शिंदे सह नऊ सदस्य यांनी तहसीलदार आजरा, यांचेकडे सादर केला होता. या अनुषंगाने महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा अध्यादेश २०१७ नुसार ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांच्या अविश्वास ठराव बाबत सचिव ग्राम विकास व जलसंधारण विभाग यांना मार्गदर्शन करण्यात आले होते. यावर उपसचिव महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांच्याकडील प्राप्त झालेले सर्वांच्या प्राप्त पत्रानुसार जिल्हाधिकारी यांनी अविश्वास ठराव संमत झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विशेष सभा ग्रामसभा योजनाचे आदेश काढावेत तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाच्या दिनांकापासून दहा दिवसांच्या आत गटापेक्षा कमी दर्जा नसणाऱ्या अधिकार या मार्फत विशेष ग्रामसभा आयोजन करावे असे सुचवले होते. मा.जिल्हाधिकारी कोल्हापूर मुंबई ग्रामपंचायत अधिकार १९५८ चे कलम ३५ प्रमाणे प्रदान करण्यात आले होते. अधिकाराचा वापर करून ग्रामपंचायत खेडे – मुंगूसवाडी तालुका आजरा या ग्रामपंचायत मधील सौ. सरपंच अविश्वास ठराव बाबत विशेष ग्रामसभा दि ९ रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे बोलवण्यासाठी गट विकास अधिकारी पंचायत समिती आजरा यांची नेमणूक नेमणुक केली होती यावेळी सभा व मतदान झाले. ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच ठरावाच्या सभेची कारवाई पूर्ण करत covid-१९ च्या नियमाने सदर सभेचे व मतदानाचे आयोजन करण्यात आले होते. या अविश्वास ठरावाच्या मतदान एकुन मतदान ८१३ पैकी ८०३ इतके मतदान झाले. (९८.७६ % ) यामध्ये ठराव विरोधात एक व ठरावाच्या बाजुने एक पैकी एक मतदान देण्याचे होते. यामध्ये अविश्वास ठरावाच्या बाजुने ५७५ तर अविश्वास ठराव विरोधात २०५ तर २३ मते अवैध झाली.

याबाबतचे पत्र तहसीलदार आजरा गटविकास अधिकारी बी. डी. वाघ, टि. जी. चव्हाण तसेच अधिकारी पंचायत समिती आजरा तहसिलदार विकास अहिर यांनी काम पाहिले, तसेच स.पोनि. सुनिल हरगुडे, उप. निरिक्षक युवराज जाधव सह पोलिस कर्मचारी यांचा कडक बंदोबस्त होतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.